
शेअर बाजारात तेजी, Sensex 980 अंकांनी वधारला
Todays Stock Market Updates: आठवड्यातील शेवटच्या दिवशी आज शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. शेअर मार्केट आज तेजीसह उघडले. सेन्सेक्स 980 अंकांनी अर्थात 1.85 टक्क्यांच्या तेजीसह 53,500 वर उघडला तर निफ्टी 290 अंकांच्या तेजीसह 16,000 सुरू झाला.
हेही वाचा: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?
कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुरुवारी भारतीय बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला आला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1416.30 अंकांनी अर्थात 2.61 टक्क्यांनी घसरून 52,792.23 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 430.90 अंकांनी म्हणजेच 2.65 टक्क्यांनी घसरून 15,809.40 वर बंद झाला होता. BSE सेन्सेक्स आणि निफ्टीने इंट्राडे मध्ये 52669.51 आणि 15775.20 च्या इंट्राडे नीचांकाला स्पर्श केला होता.
हेही वाचा: ईमुद्रा लिमिटेडचा IPO आज होणार खुला, पैसे गुंतवण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या...
गुरुवारच्या घसरणीत एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 658257.76 कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसईचे मार्केट कॅप 18 मे रोजी 25577445.81 कोटींवरून 24919188.05 कोटी रुपयांवर घसरले.
युएस रिटेल कंपन्यांच्या अलीकडील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की महागाईच्या उच्च दराचा कंपन्यांच्या व्यवसायावर खराब परिणाम होत आहे असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील किरकोळ विक्रेते टार्गेट कॉर्पचे शेअर्स इंधन आणि मालवाहतुकीतील वाढीमुळे 26 टक्क्यांहून अधिक घसरले.
आता अमेरिकेतील अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता निर्माण झाली आहे. एका दिवसापूर्वी वॉलमार्ट इंकने त्याचे निकाल जाहीर केले होते. ज्यामध्ये त्याने आपल्या कमाईचा अंदाज कापला. वाढती महागाई, मंदीची भीती आणि यूएस फेडचे निर्णय कठोर होण्याची शक्यता ही काही कारणे जागतिक बाजारावर दबाव बनवत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
Web Title: Share Market Todays Update 20 May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..