शेअर बाजाराने पॉझिटिव्ह सुरूवातीनंतर हातात घेतला लाल निशान

बाजार उघडल्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स 20 अंकांनी वधारून 57,305 वर पोहोचला.
Share Market
Share Market esakal
Summary

बाजार उघडल्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स 20 अंकांनी वधारून 57,305 वर पोहोचला.

आज शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात झाल्यावर सेन्सेक्स केवळ 5 अंकांच्या वाढीसह 57,297 वर उघडला आणि एनएसईचा निफ्टी 3 अंकांच्या किंचित वाढीनंतर 17,120 वर उघडू शकला, पण नंतर लाल रंगात घसरला. प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची सुरवात झाल्यावर सेन्सेक्स (Sensex) 5.08 अंकांच्या किंचित वाढीनंतर 57,297 वर ट्रेड करत आहे. त्याचबरोबर एनएसईचा निफ्टी (Nifty)2.80 अंकांच्या किरकोळ वाढीसह 17120च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

Share Market
Share Market: डिजिटल सोन्यातील गुंतवणूक

आज आयटी, मीडिया, मेटल आणि तेल आणि वायू क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रे घसरणीच्या लाल रंगात व्यापार करत आहेत. एफएमसीजी शेअरमध्ये सर्वाधिक 1.11 टक्के घसरण दिसून आली. बँकिंग शेअर्सही कमजोरीच्या लाल निशाण्याने व्यापार करत आहेत.

आजच्या चढत्या शेअरमध्ये ओएनजीसी 4.38 टक्क्यांनी वधारले असून आयओसी 2.58 टक्क्यांनी वधारले आहे. टाटा स्टील 1.7 टक्क्यांनी तर बीपीसीएल 1.61 टक्क्यांनी वधारले. हिंडाल्को 1.57 टक्के वाढीसह व्यापार करत होता. टॉप लूझर्सबद्दल बोलायचे झाले तर एचयूएल 2.34 टक्के, एशियन पेंट्स 1.68 टक्के आणि नेस्ले 1.6 टक्क्यांनी घसरले होते. ब्रिटानिया 1.5 टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट 1.26 टक्क्यांनी कमी व्यापार करत होता.

Share Market
Share Market: होळीआधी शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स 803 तर निफ्टी 227 अंकांनी वधारले

बाजार उघडण्यापूर्वी एसजीएक्स निफ्टीत आज वाढ झाली असून तो 49.50अंकांनी वधारून 17201च्या पातळीवर होता. कालच्या व्यवहारात एनएसईचा निफ्टी 17117 च्या पातळीवर बंद झाला होता. त्याचवेळी सेन्सेक्सबाबत बोलायचे झाल्यास तो 57292 च्या पातळीवर बंद झाला. काल बाजार घसरणीच्या लाल रंगात बंद होताना दिसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com