'या' डिफेन्स स्टॉकचा एका महिन्यात 55% परतावा, आणखी तेजी येण्याची शक्यता...

भारत डायनॅमिक्सच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका महिन्यात 55 टक्के आणि वर्षभरात सुमारे 110 टक्के परतावा दिला आहे.
Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market NewsSakal

Best Stock to Buy in Share Market: भारत डायनॅमिक्सचा (Bharat Dynamics-BDL) शेअर शुक्रवारी इंट्राडे ट्रेड दरम्यान बीएसईवर 19 टक्क्यांनी वाढून 738.70 वर पोहोचला. हा त्याचा नवा ऑल टाइम हाय (All Time High) आहे. गेल्या दोन दिवसांत या शेअरमध्ये 29 टक्के वाढ झाली आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका महिन्यात 55 टक्के आणि वर्षभरात सुमारे 110 टक्के परतावा दिला आहे. एनएसई आणि बीएसईवर शेअरचे ट्रेडिंग व्हॉल्यूम जवळपास 5 पटीने वाढले. शुक्रवार दुपारपर्यंत कंपनीचे 78.5 लाख शेअर्सचे व्यवहार झाले होते.

Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market: शेअर बाजार रुळावर! सेन्सेक्स 412 अंकांनी वधारला तर निफ्टी 17,800वर बंद

आधुनिक शस्त्रे तयार करणारी कंपनी-

भारत डायनॅमिक्सचा (Bharat Dynamics-BDL) ही संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखालील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी सरफेस टू एयर मिसाइल, अँटी टँक गायडेड मिसाइल, टॉर्पेडो आणि अलायड डिफेन्स इक्विपमेंट्स तयार करते.

यूएईच्या तवाजुन इकोनॉमिक काउंसिल या कंपनीसोबत (Tawazun Economic Council) झालेल्या करारानंतर भारत डायनॅमिक्सच्या बाजारभावात एप्रिलमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली. TEC हे युएईच्या लष्करी दलांसाठी संरक्षण खरेदी प्राधिकरण आहे. युएईच्या सशस्त्र दलांसाठी खरेदी, तंत्रज्ञान, करार व्यवस्थापित करते.

Share Market Latest Updates | Stock Market News
'या' मल्टीबॅगर एनर्जी स्टॉकने एका वर्षात दिला तब्बल एवढा परतावा!

फेब्रुवारीमध्ये भारतीय लष्कराकडून मोठी डील-

2 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीने भारतीय सैन्यासोबत 3,131.82 कोटी रुपयांचा करार केल्याचे भारत डायनामिक्सने एका निवेदनात म्हटले आहे. या अंतर्गत कंपनी तीन वर्षांत कोंकर्स-एम अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे (Konkurs - M AntiTank Guided Missiles) भारतीय लष्कराला तयार करून पुरवेल. या करारामुळे कंपनीचे ऑर्डर बुक 11,400 कोटी रुपये झाले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com