Share Market: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 866, तर निफ्टी 271 अंकांनी कोसळला

आज शेअर बाजारात कोसळला, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाली.
Share Market
Share MarketSakal

Share Market Updates: बुधवारी रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर शेअर बाजार कोसळला होता. त्यानंतर काल मात्र शेअर बाजार स्थिर राहिला. आज पुन्हा एकदा शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले आहेत. सेन्सेक्स (Sensex) 866.65 अंकांनी म्हणजेच 1.56 टक्क्यांनी वधारून 54835.58 वर बंद झाला, तर निफ्टी (Nifty) 271.40 अंकांनी म्हणजेच 1.63 टक्क्यांनी वधारून 16,411.25वर बंद झाला.

निफ्टी 50 मधील 11 शेअर्स आज दिवसअखेर हिरव्या चिन्हात बंद झाले, तर 39 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. HEROMOTOCO, TECHM, POWERGRID, ITC, ONGC हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले तर BAJFINANCE, DIVISLAB, SHREECEM, UPL, AXISBANK या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

Share Market
Share Market: शेअर बाजार कोसळला; निफ्टी-50 मधील सर्व शेअर्समध्ये घसरण

तत्पूर्वी आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले आहेत. सेन्सेक्स आज 773.94 अंकांनी कोसळून 54,928.29 वर सुरु झाला. सेन्सेक्स सकाळी 9.30 वाजेपर्यंत 54,721.78ची पातळी गाठली होती. तर निफ्टी 267.1अंकांच्या घसरणीसह 16,415.55 वर सुरु झाला. 9.30 पर्यंत निफ्टी 50 मधील सर्वच्या सर्व 50 शेअर्स लाल रंगात ट्रेड करत होते.

Share Market
Share Market: शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स 586 तर निफ्टी 177 अंकांनी वधारला

आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर बुधवारी बाजारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. गुरुवारी सकाळच्या व्यवहारात आशियाई बाजारातही चांगली तेजी पाहायला मिळाली. पण, शेवटी जगभरातील सर्वच बाजारांचा नफा कमी होऊन सपाट बंद झाल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com