Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Tips

Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market : बुधवारी बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. रियल्टी, मेटल आणि एनर्जी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. ब्रॉडर इंडेक्समध्ये प्रत्येकी एक टक्का घसरण दिसून आली.

संमिश्र संकेतांमुळे बाजार एक टक्क्याहून अधिक घसरला. सपाट सुरुवात केल्यानंतर निफ्टी हळूहळू खाली सरकला. शेवटी 18,042 वर बंद झाला.

सेन्सेक्स 636.75 अंकांनी अर्थात 1.04 टक्क्यांनी घसरून 60,657.45 वर बंद झाला. तर निफ्टी 189.50 अंकांनी अर्थात 1.04 टक्क्यांनी घसरून 18,043 वर बंद झाला.

बाजाराची सुरुवात नकारात्मक ट्रेंडने झाली. यानंतर निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स 18,020.60 आणि 60,593.56 च्या नीचांकी पातळीवर पोहोचले. बीएसई स्मॉलकॅप्स आणि मिडकॅप्स निर्देशांकात प्रत्येकी 1 टक्क्यांनी घसरण झाली.

हेही वाचा: Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी खरेदी केली आणखी एक कंपनी; 100 वर्षे जुन्या कंपनीशी झाली डील

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीला आणखी एका सत्रासाठी वाढत्या ट्रेंडलाइन आणि मुख्य डेली मूव्हिंग एव्हरेजजवळ रेझिस्टन्सचा सामना करावा लागल्याचे शेरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. यानंतर, निर्देशांक 18,000 च्या पातळीवर घसरला.

निफ्टी 18,000 ची पातळी खाली आणत नाही तोपर्यंत तो पुन्हा 18,250-18,300 पर्यंत चढू शकतो. दुसरीकडे, 18,000 तोडल्यास निफ्टीसाठी शॉर्ट टर्ममध्ये कंसोलिडेशन दिसू शकते. अशा स्थितीत तो 17,800 च्या दिशेने सरकताना दिसतो असेही ते म्हणाले.

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • हिंदाल्को (HINDALCO)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • ओएनजीसी (ONGC)

  • ट्रेन्ट (TRENT)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.