Share Market : आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market : आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी मंदीच्या सुरुवातीनंतर, बाजारात मोठी तेजी दिसून आली आणि सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले.शांत सुरुवातीनंतर सेन्सेक्सने 454 अंकांची उसळी घेतली, निफ्टी 17536 वर बंद झाला, रिलायन्स 6% पेक्षा जास्त वाढला.

गुरुवारी साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी सुस्त सुरुवात केल्यानंतर, बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. आशियाई बाजारातील तेजीमुळे देशांतर्गत बाजारात सेंटिमेंट मजबूत राहिले. दुसरीकडे, रिलायन्स सारख्या हेवीवेट स्टॉक्स आणि रियल्टी, आयटी आणि फार्मा शेअर्समधील खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला. रिलायन्स गुरुवारी 6 टक्क्यांहून अधिक वाढला. त्यामुळेच सेन्सेक्स 454.10 अंकांच्या वाढीसह 58,795.09 वर बंद झाला आणि निफ्टी 121.20 अंकांनी वाढून 17,536.25 वर बंद झाला.

हेही वाचा: बाकडे, पिशवी अन् बकेट कार्यकर्त्यांची घेतली विकेट

सेन्सेक्सवर बँकिंग शेअर्समध्ये संमिश्र कल दिसून आला. दुसरीकडे निफ्टी बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, पीएसयू बँक आणि प्रायव्हेट बँक वगळता इतर क्षेत्रांचे निर्देशांक वाढीसह बंद झाले. निफ्टी रियल्टीमध्ये सर्वात मोठा फायदा झाला आणि तो 1.95 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आणि निफ्टी ऑटोमध्ये 0.54 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. निफ्टी बँक 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्सवरील 14 शेअर्स आणि निफ्टीवरील 25 शेअर्स वाढीसह बंद झाले.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?
रिलायन्स (RELIANCE)

डिविस लॅबोरेटरीज (DIVSLAB)

आयटीसी (ITC)

इन्फोसिस (INFY)

टाटा कन्झ्युमर्स (TATACOMSUME)

आयडिया ( IDEA)

एनआयआयटी टेक्नोलॉजीज (COFORGE)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

एसआरएफ (SRF)

टाटा पॉवर (TATA POWER)

हेही वाचा: मेकॅनिकल इंजिनिअर ते चित्रकार!

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top