esakal | Share Market: सेन्सेक्स 442.27 अंशांनी वधारला, निफ्टी 11,879.20 अंशांवर
sakal

बोलून बातमी शोधा

stock market.

व्यापार सप्ताहाच्या सुरुवातीला देशातील भांडवली बाजारात आज (19 ऑक्टोबर) घसघशीत वाढ दिसली.

Share Market: सेन्सेक्स 442.27 अंशांनी वधारला, निफ्टी 11,879.20 अंशांवर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: व्यापार सप्ताहाच्या सुरुवातीला देशातील भांडवली बाजारात आज (19 ऑक्टोबर) घसघशीत वाढ दिसली. आज सेन्सेक्स 442.27 अंशांनी वधारून 40,425.25 अंशांवर गेला आहे. तसेच निफ्टीतही सकारात्मक वातावरण दिसले, निफ्टीच्या निर्देशांकात 116.75 अंशांची भर पडली 11,879.20 अंशांवर स्थिरावला.

भांडवली बाजारात 739 शेअर्समध्ये वाढ तर 212 शेअर्स घसरताना दिसले. तसेच 67 शेअर्समध्ये काहीही बदल होताना दिसला नाही. आजच्या सत्रात तेल-वायूच्या साठ्यांनाही खरेदी दिसून आली आहे. बीएसईचा तेल आणि वायू निर्देशांक 1 टक्क्यांसोबत व्यवहार करताना दिसत आहे. 

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्यापासून लागू होणार नवीन नियम

आजच्या भांडवली बाजारातील तेजीत मोठ्या शेअर्ससह मिडकॅपच्या शेअर्समध्येही वाढ होताना दिसली आहे. सध्या बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.35 टक्के दराने व्यवहार करत आहे. तर स्मॉलकॅप शेअर्समध्येही चांगली प्रगती होताना दिसत आहे. सत्राच्या सुरुवातीपासून स्मॉलकॅप निर्देशांक सुधारत असून सध्याचा बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.54 टक्के दराने व्यवहार करत आहे.

शुक्रवारी बाजारात होती तेजी-
यापूर्वी शुक्रवारी देशातील भांडवली बाजारात वाढ झाली होती. मागील सप्ताहातील शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 254.57 अंशांनी वधारून 39982.98 अंशांवर बंद झाला आणि निफ्टी 82.10 अंशांनी वाढून 11762.50 अंशांवर बंद झाला होता.

Gold prices: मागील 3 दिवसांत सोने दुसऱ्यांदा उतरले; जाणून घ्या आजची किंमत

इक्विटी म्युच्युअल फंडाच्या सर्व योजनांना नवीन नियम लागू-
नीलेश शहा यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, ' debt schemes आणि conservative hybrid fund वगळता बाकी सर्व म्युच्युअल फंडच्या खरेदी आणि विक्रीसाठी कट ऑफ वेळ 3 पर्यंत वाढवली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांच्या सर्व योजनांना हा नवीन नियम लागू असेल.'

पण सेबीच्या पुढील आदेशापर्यंत debt schemes आणि conservative hybrid फंडाच्या खरेदी आणि विक्रीची वेळ बदलली जाणार नाही. काही दिवसांपुर्वीच सेबीने कट ऑफची वेळ बदलून दुपारी 12.30 पर्यंत केली होती. आता पुन्हा पहिल्यासारखाच कट ऑफचा टायमिंग केला आहे. गुंतवणूकदारांना याचा फायदा त्या दिवसाची एनएव्ही (Net Asset Value) मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

(edited by- pramod sarawale)