esakal | Share Market: जागतिक घडामोडींचा परिणाम! शेअर मार्केट सुरु होताच मोठी घसरण

बोलून बातमी शोधा

SHARE MARKET}

शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये 900 पेक्षा अधिक अंकाची घट पाहायला मिळाली.

Share Market: जागतिक घडामोडींचा परिणाम! शेअर मार्केट सुरु होताच मोठी घसरण
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली Stock Market Updates- शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये 900 पेक्षा अधिक अंकाची घट पाहायला मिळाली. तसेच निफ्टी 14,800 अंकावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. 30 शेअर्स असणाऱ्या बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्स लाल चिन्हासह सुरु झाले. 

बायडेन इन ॲक्शन! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच एअर स्ट्राइक; दहशतवादी तळ...

सुरुवातीला सेन्सेक्स 917.24 अंकांनी म्हणजे 1.80 टक्क्यांची घट पाहायला मिळाली. त्यानंतर BSE सेन्सेक्स 50,122.07 अंकावर ट्रेंड होत होता. दुसरीकडे NSE निफ्टीमध्ये 267.80 अंकांनी म्हणजे 1.77 टक्क्यांची घसरण झाली आणि इंडेक्स 14,829.60 च्या लेवलवर ट्रेंड होत आहे. शेअर मार्केटमधील या घसरणीमागे अमेरिकेने केलेला एअर स्ट्राईल असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणसोबत अणु करारावर झालेल्या वादानंतर अमेरिकेनं इराणचा प्रभाव असलेल्या मिलिशियातील अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. सिरियातील मिलिशियाच्या ठिकाणांवर हवाई हल्ला करण्यात आलाय.

फायनेन्शियल आणि PSU  बँकिंग सेक्टरमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक स्तरावरील संकेतामुळे ही घसरण झाली आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या इंडेक्सवर आलेल्या  घसरणीचा परिणाम आशिया आणि देशातील शेअर मार्केटवर दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या  S&P/ASX मधील सुरुवातीच्या व्यवहारात 200 अंकाची घट पाहायला मिळाली आहे. जपानचा निक्केईमध्येही 225 अंकाची घट झालीये. 

Balakot Air Strike: 'बंदर मारा गया', एअर स्ट्राईकच्या 15 मिनिटांनी...

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीचा (ऑक्टोबर-डिसेंबर) जीडीपी विकास दराचा अंदाज जारी करणार आहे. त्यामुळेही शेअर मार्केटमध्ये घट दिसून आल्यासं सांगण्यात येतंय. भारतीय अर्थव्यवस्थेची विकास गती मंदावली आहे. मात्र, तिसऱ्या तिमाहीमध्ये ग्रोथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.