
एचडीएफसी लाइफचे शेअर्स देणार 54 टक्के परतावा; तिमाही निकालानंतर तज्ञांचा विश्वास
शेअर बाजारात सध्या लिस्टेड कंपन्या त्यांचे तिमाही निकाल सादर करत आहेत. अलीकडेच, एचडीएफसी लाइफ (HDFC Life) या विमा क्षेत्रातील कंपनीने आपले तिमाही निकाल सादर केले. कंपनीने चांगले तिमाही निकाल सादर केले आहेत. कंपनीच्या नफा आणि निव्वळ प्रीमियम उत्पन्नात वाढ झाली आहे. तिमाही निकालानंतर, अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी या शेअरवर बाय रेटींग (Buy Rating) दिले आहे. तुम्हीही शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी मजबूत स्टॉक शोधत असाल तर तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे गुंतवू शकता असे अनेक ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे.
ब्रोकरेज कंपनी CLSA ने एचडीएफसी लाइफ (HDFC Life) शेअरवर खरेदीचे मत दिले आहे. मात्र, टारगेट 700 रुपये करण्यात आली आहे. CLSA च्या मते, कंपनीने VNB मध्ये मजबूत कामगिरी केली आहे. याशिवाय बँक ऑफ अमेरिकेनेही खरेदीचे मत कायम ठेवले आहे आणि 780 रुपयांचे टारगेट दिले आहे.
हेही वाचा: गुंतवणूकदार मालामाल; HDFC विलीनीकरणाने तेजी
याशिवाय मॉर्गन स्टॅन्लेने या स्टॉकवर ओव्हरवेटचे रेटिंग कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे आणि 675 रुपये टारगेट दिले आहे. याशिवाय, मॅक्वेरीने आउटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवत 850 रुपयांचे टारगेट दिले आहे.
याशिवाय जेपी मॉर्गनने या स्टॉकवर न्यूट्रलचे रेटिंग कायम ठेवले आहे आणि टारगेट 580 रुपयांवरून 600 रुपये केले आहे. दुसरीकडे, गोल्डमन सॅक्सने खरेदीचे मत दिले आहे, पण टारगेट 790 रुपयांवरून 710 रुपये केले आहे. त्याच वेळी, नोमुराने खरेदीचे मत कायम ठेवत टारगेट 750 रुपयांवरून 680 रुपयांपर्यंत कमी केले आहे.
हेही वाचा: HDFC Merging: HDFC Ltd आणि HDFC बँकेचं विलीनीकरण
कंपनीचे तिमाही निकाल कसे होते?
अलीकडेच, कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल सादर केले. कंपनीच्या नफ्यात 18.6 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 317.9 कोटी रुपयांऐवजी 377कोटी रुपये झाला आहे. याशिवाय नेट प्रीमियम इन्कममध्ये 12.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर VNB मार्जिन 27.2 टक्के राहिले.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Shares Of Hdfc Life Will Return 54 Experts Believe After Quarterly Results
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..