Shark Tank : KL राहुलचा भाऊ शार्क टँकमध्ये, अश्विन आहे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, तरीही शार्कने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shark Tank

Shark Tank : KL राहुलचा भाऊ शार्क टँकमध्ये, अश्विन आहे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, तरीही शार्कने...

शार्क टँक इंडिया सीझन 2 या बिझनेस रिअॅलिटी शोमध्ये दोन तरुण उद्योजक बॉलिंग मशीनशी संबंधित व्यवसाय घेऊन आले. परंतु शार्कने त्याच्या व्यवसायाची कल्पना नाकारली.

प्रतीक पलनेत्रा आणि विश्वनाथ गे 'फ्री बॉलर' या बॉलिंग मशीन ब्रँडची ओळख करून देण्यासाठी आले होते. त्याने सांगितले की, त्याची अशी एकमेव कंपनी आहे जी अत्यंत कमी किंमतीत बॉलिंग मशीन बनवून देते.

त्यांनी ब्रँडमधील 7.5% इक्विटीसाठी 75 लाखांची मागणी केली. परंतु ते शार्कला प्रभावित करण्यात अपयशी झाले.

मात्र, जेव्हा त्यानी त्यांच्या ब्रँडचा अॅम्बेसेडर भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन असल्याचे उघड केले तेव्हा शार्क चकित झाले होते. प्रतीक पलनेत्राने सांगितले की, तो भारतीय फलंदाज के. एल राहुलचा चुलत भाऊ आहे.

जेव्हा शार्कने त्याच्या पार्श्वभूमीबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की, तो अंडर 16 चा खेळाडू होता आणि आता तो अम्पायर आहे.

हेही वाचा: Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी बंदीवर RBI गव्हर्नर यांचे सूचक विधान; म्हणाले, क्रिप्टोकरन्सी हा फक्त...

प्रतीक पलनेत्रा याची पार्श्वभूमी क्रिकेटशी जोडलेली आहे. त्याने त्याच्या उत्पादनाचा डेमो दाखवला आणि त्याची किंमत शार्कला सांगितली.

शार्कने त्या कंपनीत गुंतवणूक करण्यास नकार दिला कारण प्रतीक आणि विश्वनाथ यांनी सांगितले की, त्यांचा व्यवसाय तोट्यात आहे.

हेही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

अनुपम मित्तल म्हणाले की, बाजारात या उत्पादनाला मागणी नाही. मला आश्चर्य वाटते की, तुम्हाला बाजाराबद्दल काहीच माहिती नाही. तुम्ही 5 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत आहात, तरीही तुमचा व्यवसाय तोट्यात आहे, असे का?

25 लाखात सौदा आणि 50 लाखांचे कर्ज

नमिता थापरने मालकांना कराराची ऑफर दिली आणि तिने 15% इक्विटीसाठी 25 लाख आणि 5% व्याजाने 50 लाख कर्ज देऊ केले.

मात्र, प्रतीक आणि विश्वनाथ यांनी काउंटर ऑफर मांडली आणि नमिता म्हणाली, 'मी तुम्हाला ऑफर देत आहे आणि तुम्ही मला काउंटर देत आहात, बाकीच्या शार्कनीही रस दाखवला नाही.'