esakal | भारतीय व्हिडिओ ई-कॉमर्स Simsim ची मालकी YouTube कडे!
sakal

बोलून बातमी शोधा

SIMSIM

यूट्यूबने भारतीय व्हीडिओ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सिमसिमचे अधिग्रहन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात ही कंपनी यूट्यूबच्या मालकीची होणार आहे.

भारतीय व्हिडिओ ई-कॉमर्स Simsim ची मालकी YouTube कडे!

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- यूट्यूबने भारतीय व्हीडिओ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सिमसिमचे अधिग्रहन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात ही कंपनी यूट्यूबच्या मालकीची होणार आहे. गूगलने एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटलंय की, आम्ही प्रेक्षकांना स्थानिक प्रोडक्टचा शोध आणि खरेदीसाठी मदत करण्यासाठी एक मोठं पाऊल उचलत आहोत. आम्ही सिमसिमचे अधिग्रहन करण्यासाठी एका करारावर हस्ताक्षर केले आहे. येत्या काळात सर्व व्यवहार पूर्ण होण्याची आशा आहे. (YouTube to acquire Indian video e-commerce startup simsim)

कंपनीने आर्थिक देवाणघेवाणीचा खुलासा केलेला नाही. सिमसिममध्ये तात्काळ काही बदल होणार नाहीत आणि ऍप स्वतंत्र स्वरुपात काम करत राहील. YouTube प्रेक्षकांना सिमसिम ऑफर दाखवण्याच्या पद्धतीवर काम करत आहे. एका संयुक्त निवेदनात सिमसिमचे सह-संस्थापक अमित बगरिया, कुणाल सुरी आणि सौरभ वशिष्ठ यांनी म्हटलं की, प्लॅटफॉर्म संपूर्ण भारतात आपल्या उपयोगकर्त्यांना सहजरित्या ऑनलाईन खदेरी करण्यासाठी मदत करण्यासाठी सुरु करण्यात आले होते.

हेही वाचा: डोंबिवलीत अभिनेता उतरला रस्त्यावर, खड्ड्यांचे मांडले वास्तव

यामध्ये छोटे विक्रेते आणि ब्रँडना स्थान देण्यात आले. आपल्या प्रोडक्टचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी या ऍपचा वापर केला जातो. त्यांनी म्हटलं की, यूट्यूब आणि गूगलचा भाग झाल्यानंतरही सिमसिम आपल्या मिशनमध्ये पुढे जात राहील. सिमसिम आणि यूट्यूबला एकत्र आणून छोटे उद्योग आणि किरकोळ विक्रेत्यांना नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उदिष्ठ असल्याचे ब्लॉगपोस्टमध्ये सांगण्यात आलंय. प्रोडक्टबाबतचे रिव्हुव्ह अॅपवर पाहायला मिळतील आणि ग्राहकांना ते अॅपवरुन खरेदी करता येतील. अॅप सध्या हिंदी, तमिळ आणि बंगाली या तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा: पोर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरण: राज कुंद्राला 23 जुलै पर्यत कोठडी

ब्लॉगपोस्टमध्ये म्हणण्यात आलंय की, जसंजसं अधिक प्रमाणात लोक ऑनलाईन खरेदी करत जातील, तसे ग्राहकांना नवीन प्रोडक्टचा शोध घेण्यासाठी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात व्हीडिओ महत्त्वपूर्ण भूमिका बजावू लागतील. प्रोडक्टची तुलना, समीक्षा आणि आपल्या आवडीच्या गोष्टींची शिफारस मिळवण्यासाठी दररोज अनेक ग्राहक YouTube वर येत असतात.

loading image