esakal | पोर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरण: राज कुंद्राला 23 जुलै पर्यत कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra video

पोर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरण: राज कुंद्राला 23 जुलै पर्यत कोठडी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला (raj kundra) अटक केली आहे. शिल्पा शेट्टी (shilpa shetty) आणि बिझनेसमन अशी ओळख असलेल्या राजवर यापूर्वी याप्रकारचे आरोप झाले आहेत. राजला अटक केल्यानंतर दहा तासांच्या आत क्राईम ब्रँचनं नेरुळ भागातून रायन थारप नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या दोघांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना अटक केल्यानंतरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (pornography case crime branch arrested ryan arrested yesterday in this case yst88)

फेब्रुवारी 2021 मध्ये राजच्या नावानं तक्रार दाखल करण्यात आली होती. काल रात्री राजला मुंबई क्राईंम ब्रँच पोलिसांनी अटक केली. पोर्नोग्राफी व्हिडिओ तयार करण्याच्या प्रकरणात त्याचा महत्वाचा वाटा असल्याची चर्चा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांकडे त्याच्या विरोधात सबळ पुरावे असल्याची बाब समोर आली आहे. राजवर अश्लील चित्रपट तयार करणे तसेच ते व्हिडिओ एका अॅपच्या माध्यमातून दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. न्यायालयानं आता त्याला 23 जुलैपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

क्राईम ब्रँचचं असं म्हणणं आहे की, राज कुंद्रा यासगळ्या प्रकरणात मास्टर माईंड आहे. त्याचा याप्रकरणात मोठा सहभाग आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर फेब्रुवारी महिन्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजनं ब्रिटनमध्ये राहत असलेल्या केनरिन या भावाच्या नावानं एक कंपनी तयार केली होती. त्यामाध्यमातून पॉर्न फिल्म दाखवली जात होती. या चित्रपटाचे व्हिडिओ हे भारतात चित्रित केले जात होते. आणि व्ही ट्रान्सफरच्या माध्यमातून ते परदेशात पाठवले जायचे.

हेही वाचा: राज कुंद्राची तुरूंगातील एक रात्र ते गेहना वशिष्ठचा सहभाग, जाणून घ्या सारं काही

हेही वाचा: इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण: अभिनेत्री हिना पांचाळला जामीन मंजूर

मुंबई क्राईम ब्रँच आज राज कुंद्राला कोर्टात हजर करणार आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्याजवळ राज कुंद्रा यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. पोलिसांनी व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उमेश कामत याला देखील अटक केली आहे.

loading image