जीएसटी महसुलात किंचित सुधारणा; अर्थमंत्रालयाची माहिती

GST
GST

नवी दिल्ली - लॉकडाउनममुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार हळुहळू सुरू होऊ लागल्यानंतर जीएसटी वसुलीतून सरकारला मिळणाऱ्या महसुलामध्येही किंचितशी सुधारणा होऊ लागल्याचे दिसत आहे. सप्टेंबरमध्ये सरकारला ९५,४८० कोटी रुपये जीएसटीपोटी महसूल मिळाल्याचे अर्थमंत्रालयातर्फे आज सांगण्यात आले. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये ९१,९१६ कोटी रुपयांचा महसूल जीएसटीपोटी जमा झाला होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारला सप्टेंबरमध्ये मिळालेल्या एकूण जीएसटीमध्ये १७७४१ कोटी रुपये सीजीएसटी, २३१३१ कोटी रुपये एसजीएसटी आणि ४७४८४ कोटी रुपये आयजीएसटीचा समावेश आहे. त्यातही २२२४४२ कोटी रुपये आयातीवरील मिळाले आहेत. तसेच ७१२४ कोटी रुपयांच्या उपकराचीही मिळकत सरकारला झाली आहे.  मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत यंदाचा महसूल ४ टक्क्यांनी अधिक असून ही वाढ आयात आणि देशांतर्गत व्यवहारांमुळे असल्याचेही सरकारचे म्हणणे आहे.

गुजरातमधून मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मिळालेल्या ५७४१ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ६०९० कोटी रुपयांची वसुली झाली. ही वाढ ६ टक्क्यांची आहे. तर कोरोना संकटाची झळ सोसणाऱ्या महाराष्ट्रातील वसुलीचा आकडा स्थिर आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये १३५७९ कोटी रुपये महाराष्ट्रातून जीएसटी वसुल झाला होता. यंदाची रक्कम १३५४६ कोटी रुपये आहे. 

लॉकडाउनचा महसुलावर परिणाम
लॉकडाउनमुळे जीएसटी वसुलीत झालेली घट सरकारच्या चिंतेचे कारण ठरली आहे. मागील वर्षीची जीएसटी वसुलीची सरासरी साधारणपणे एक लाख कोटी रुपयांची असताना यंदा लॉकडाऊउनमुळे एप्रिलमध्ये फक्त ३२१७१ कोटी रुपयांचाच महसूल मिळाला. मेमध्ये ही रक्कम कशीबशी ६५१५१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. जूनमध्ये ९०९१७ कोटी रुपये जीएसटी मिळाला असला तरी जुलै आणि ऑगस्टमध्ये त्यात पुन्हा अनुक्रमे ८७४२२ कोटी आणि ८६४४९ कोटी रुपये अशी घसरण झाली होती. 

जीएसटी महसूल
९१,९१६ सप्टेंबर २०१९
९५,४८० सप्टेंबर-२०२०

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com