Solar Industries : इंडियाच्या शेअर्समध्ये या कंपनीच्या शेअर्सची दमदार खरेदी, वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solar Industries

Solar Industries : इंडियाच्या शेअर्समध्ये या कंपनीच्या शेअर्सची दमदार खरेदी, वाचा सविस्तर

Solar Industries : सोलार इंडस्ट्रीज इंडिया (Solar Industries India) या उद्योगांसाठी एक्स्प्लोसिव्ह तयार करणाऱ्या कंपनीत शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळेच हा शेअर शुक्रवारी 6 टक्क्यांच्या तेजीसह 4398.70 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचत 11 नोव्हेंबरचा 4269.40 रुपयांचा उच्चांक मोडला. रेटिंग एजन्सी आयसीआरए (ICRA) आणि क्रिसिलने (Crisil) यावर स्टेबल आउटलुकची रेटिंग दिली आहे. सोलर इंडस्ट्रीजचे शेअर्स आता सुमारे 5 टक्क्यांच्या वाढीसह 4369.65 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

मायनिंग, इंफ्रा आणि डिफेन्स सेक्टर्समधून याच्या प्रॉडक्ट्सना चांगली मागणी आहे. याला सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत'चाही सपोर्ट मिळत आहे.

सोलर इंडस्ट्रीजचे मॅन्युफॅक्चरींग इन्फ्रास्ट्रक्चर मोठे आहे आणि त्यातील काही खाणीजवळ आहेत. भारताशिवाय परदेशातही ही कंपनी कार्यरत आहे. त्याची उत्पादने जगातील 65 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जातात.

आयसीआरएच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या सहामाहीत, एप्रिल-सप्टेंबर 2022 मध्ये, सोलर ग्रुपच्या एकूण कमाईपैकी 42 टक्के महसूल भारताबाहेरील निर्यात आणि विक्रीतून आला आहे.

सोलर ग्रुप हा देशातील मोठ्या प्रमाणात कार्ट्रिज एक्सप्लोसिव्ह्स, डिटोनेटर, डिटोनेटिंग कॉर्ड आणि कंपोनंट्स बनवणारा सर्वात मोठा उत्पादक आहे. भारताव्यतिरिक्त, नायजेरिया, झांबिया, घाना, दक्षिण आफ्रिका, तुर्की आणि टांझानियामध्ये 29 ठिकाणी मॅन्यूफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत. याशिवाय कंपनी आता इंडोनेशिया, थायलंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही प्लांट उघडणार आहे. 2010 मध्ये सोलर ग्रुपने डिफेन्स सेक्टरमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा: Share Market : 65 पैशांचा 'हा' शेअर पोहोचला 306 रुपयांवर; तुमच्याकडे आहे का हा शेअर?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.