
नवीन वर्षात घर खरेदी करणाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठ्या बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाने खुशखबर दिली आहे.
नवीन वर्षात घर खरेदी करणाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठ्या बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाने खुशखबर दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गृह कर्जात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गृह कर्जाचे दर 30 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.3 टक्क्यांनी कमी केले आहेत. याशिवाय प्रोसेसिंग फी देखील माफ करण्याची घोषणा एसबीआयने केली आहे. हा व्याज दर आठ मोठ्या शहरांमध्ये गृह कर्जासाठीही उपलब्ध होणार आहे. आणि हा व्याज दार पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर राहणार असल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे.
छप्परफाड ऑफर! 20 वर्षांसाठी 0 टक्के व्याजदराने बँक देतेय होम लोन
स्टेट बँकेने जारी केलेल्या निवेदनात गृह कर्जावरील नवीन व्याज दर सिबिल स्कोरशी जोडले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आणि हे व्याज दर 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 6.80 टक्के, तर 30 लाख रुपयांपेक्षा कर्जावर 6.95 टक्के व्याज दर राहणार आहे. याव्यतिरिक्त, महिला कर्जदारांना 0.05 टक्के अतिरिक्त सूट मिळणार असल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे.
आता बँकेत जाण्याची गरज नाही, Paytm वर मिळेल 2 मिनिटांत 2 लाखांचे कर्ज
पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी आठ महानगरांमध्ये देखील 0.30 टक्क्यांपर्यंत व्याज सवलत उपलब्ध राहणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. व यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिजिटल योनो ऍप वरून देखील अर्ज करता येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.