esakal | Inside Story : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'असा' काढा तुमचा (PF) प्रॉव्हिडंट फंड
sakal

बोलून बातमी शोधा

Inside Story : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'असा' काढा तुमचा (PF) प्रॉव्हिडंट फंड

पीएफ खातेधारक आपले तीन महिन्यांचे मूळ वेतन व महागाई भत्ता किंवा त्यांच्या खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेतील एक तृतीयांश एवढी रक्कम काढू शकणार आहेत.

Inside Story : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'असा' काढा तुमचा (PF) प्रॉव्हिडंट फंड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगात सगळीकडे 'कोरोना' या विषाणूंनी थैमान घातल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या संकटाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. आपल्या देशातही 'कोरोना'ची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे भारत सरकारने २१ दिवसांचे लॉक डाऊन घोषित केले आहे. आतापर्यंत भारत जवळपास १४४० लोकांना या विषाणूंचा संसर्ग झाला आहे. कामिन्युटी ट्रान्समिशन होऊ नये म्हणून सरकार कठोरात कठोर पाऊले उचलत आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या नोकरीला मुकावे लागत आहे. तसेच कामावर नसल्यामुळे पूर्ण पगार मिळण्याची शाश्वती नाही. तुम्हाला पैशाची चणचण याकाळात भासू नये म्हणून देशातील सुमारे सहा कोटीहून अधिक खातेदारांना पैसे काढण्याची सोय कर्मचारी भविष्य निधीने (ईपीएफ) दिली आहे.

या संदर्भातील एक अधिसूचना जारी करण्यात आली असून ईपीएफ खातेधारक आपले तीन महिन्यांचे मूळ वेतन व महागाई भत्ता किंवा त्यांच्या खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेतील एक तृतीयांश एवढी रक्कम काढू शकणार आहेत. ही रक्कम पुन्हा खात्यात ठेवण्याची गरजही नाही, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

SBI मागोमाग 'या' चार बँका पुढील तीन महिने EMI घेणार नाहीत...

कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभरातील सर्व उद्योगधंदे, खासगी कार्यालये ठप्प झाली असून या क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो ईपीएफधारकांना यातून दिलासा मिळावा म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे. या संदर्भात कामगार खात्याने कर्मचारी भविष्य निधी योजना १९५२ कायद्यातील दुरुस्तींचा आधार घेत २८ मार्च २०२०ला ही अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असंघटित क्षेत्राता १ लाख ७४ हजार कोटी रु.चे पॅकेज जाहीर करताना ईपीएफ खात्यासंदर्भात माहिती दिली होती.

पीएफ काढण्यासाठी पात्रता काय? 

१. तुमचा 'युएएन' नंबर ऍक्टिव्हेट केलेला असावा 
२. तुमचे आधार कार्ड व्हेरिफाय करून 'युएएन' नंबरशी लिंक असावे लागेल. 
३. तुमचे बँक खाते व आयएफएससी कोड  अपडेटेड असावे. 

किती पीएफ काढता येणार? 

पीएफ खातेधारक आपले तीन महिन्यांचे मूळ वेतन व महागाई भत्ता किंवा त्यांच्या खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेतील एक तृतीयांश एवढी रक्कम काढू शकणार आहेत. ही रक्कम पुन्हा खात्यात ठेवण्याची गरजही नाही. 

मोठी बातमी -"भरपूर पाणी प्या आणि कोरोनाला पळवा" ; काय आहे व्हायरल सत्य/असत्य ?

पीएफ काढण्यासाठी अर्ज कसा कराल? 
१. सुरवातीला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या संकेतस्थळावर जा 
२. संकेतस्थळावर गेल्यानंतर 'गो ऑनलाईन सर्व्हिसेस' सिलेक्ट करा. त्यानंतर क्लेम सिलेक्ट करा ( फॉर्म ३१, १९, १०C आणि १०D)
३. तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकून खाते व्हेरिफाय करा 
४. 'प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेम' वर क्लिक करा 
५. ड्रॉपडाऊनमध्ये जाऊन पीएफ ऍडव्हान्स (फॉर्म ३१) सिलेक्ट करा   
६. ड्रॉपडाऊनमध्ये जाऊन 'आऊटब्रेक ऑफ पँडेमिक (कोविड-१९) हा पर्पज सिलेक्ट करा 
७. तुम्हाला जेवढी रक्कम काढायची आहे तेवढी रक्कम टाका. नंतर स्कॅन केलेल्या चेकची कॉपी अपलोड करून तुमचा पूर्ण पत्ता भरा 
८. 'गेट आधार ओटीपी'वर क्लिक करा 
९. आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाका 
१०. 'सबमिट क्लेम'वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा क्लेम सबमिट होईल.  

तुमचा पीएफ काढण्यासाठी क्लेम सबमिट केल्यानंतर पीएफची रक्कम तीन दिवसांत तुमच्या खात्यात जमा होईल.

step by step process for withdrawal of provident fund during corona crisis

loading image