esakal | शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 397 अंश वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

stock market

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 397 अंश वाढला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : आशियाई शेअर बाजारांमधील तेजीच्या लाटेचा फायदा घेत गुंतवणुकदारांनी खरेदी केल्यामुळे आज भारतीय शेअरबाजारही पाऊण टक्का वाढले. सेन्सेक्स 397 अंश तर निफ्टी 119 अंश वाढला. चिनी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेतील सकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय शेअरबाजारही वाढले. त्यामुळे दिवसअखेरीस सेन्सेक्स पुन्हा त्रेपन्न हजारांजवळ (52,769 अंश) गेला तर निफ्टी 15 हजार 800 च्या वर (15,812) स्थिरावला. सेन्सेक्स 397 अंश तर निफ्टी 119 अंशांनी वाढला. (Stock market boom The Sensex rose 397 points)

हेही वाचा: Fact Check: 'एक परिवार, एक नोकरी'; केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना?

चिनी अर्थव्यवस्थेत आणखी सुधारणा होत असल्याचे संकेत मिळाल्याने तसेच चीनमधील आयटी क्षेत्राचे समभाग पुन्हा वधारल्याने आज सकाळपासून आशियातील शेअर बाजार वाढले होते. त्यातच भारतातील मे महिन्यातील औद्योगिक उत्पादन वाढल्याने आणि चलनवाढीचा दर किंचित कमी झाल्याने भारतीय गुंतवणुकदारांना बळ मिळाले. त्यामुळे आज सेन्सेक्स व निफ्टीमध्ये सकाळपासूनच तेजी होती.

हेही वाचा: प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

आज आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, अॅक्सीस बँक, सनफार्मा दोन ते तीन टक्के वाढले. महिंद्र आणि महिंद्र, एचडीएफसी बँक, कोटक बँक, लार्सन टुब्रो, रिलायन्स या समभागांचे दर पाऊण ते एक टक्का वाढले. दुसरीकडे एचसीएल टेक, डॉ. रेड्डी या समभागांचे दर एक टक्का घसरले तर टेक महिंद्र, मारुती यांचेही दर अर्धा टक्का कमी झाले.

आजचे सोन्याचांदीचे दर

  • सोने - 47,890 रु.

  • चांदी - 69,400 रु.

loading image