esakal | Fact Check: 'एक परिवार, एक नोकरी'; केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना?
sakal

बोलून बातमी शोधा

Fact Check: 'एक परिवार, एक नोकरी'; केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना?

Fact Check: 'एक परिवार, एक नोकरी'; केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना?

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे दावे केलेले पहायला मिळतात. बरेचदा असे दावे खरे असतात कि खोटे, यासंदर्भात देखील स्पष्टपणे पुरेशी माहिती उपलब्ध नसते. सध्या असाच एक दावा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक युट्युब चॅनेलवर असा दावा केला जातोय की, केंद्र सरकार 'एक परिवार, एक नौकरी योजना' चालवत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जात आहे.

हेही वाचा: देशातील पहिल्या रुग्णाला दीड वर्षानंतर पुन्हा कोरोनाची लागण

हेही वाचा: प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

PIB फॅक्ट चेलमध्ये हा दावा चुकीचा आढळून आला आहे. हा दावा खोटा असून केंद्र सरकारद्वारे अशाप्रकारची कोणतीही योजना चालवली जात नाहीये. एका युट्यूब चॅनेलमध्ये दावा केला गेलाय की, 1 जानेवारीपासून ही योजना संपूर्ण देशभरात लागू झाली आहे. या योजनेनुसार, अशिक्षित ते शिक्षित अशा प्रत्येक कुटुंबियातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल. या व्हिडीओमध्ये या योजनेसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो देखील लावण्यात आलाय. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते डॉक्यूमेंट्स असणं गरजेचं आहे, ते देखील सांगण्यात आलंय.

हेही वाचा: थायलंडमध्ये बूस्टर डोस ॲस्ट्राझेनिकाचा; चीनच्या सिनोव्हॅकचा प्रभाव कमी

या योजनेबाबत या व्हिडीओमध्ये अनेक प्रकारचे दावे केले गेलेत. मात्र, हे सगळेच दावे पूर्णपणे निराधार आहेत तसेच खोटे आहेत. अशा प्रकारची कोणतीही योजना केंद्र सरकारने सुरु केली नाहीये तर सरकार अशी कोणतीही योजना सुरु करण्याच्या विचारात नाहीये. या प्रकारच्या दाव्यांवर अनेक लोक विश्वास ठेवतात तसेच याला बळी देखील पडतात. मात्र, अशा प्रकारच्या दाव्यांवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यासत्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे कारण यामार्फत आपली आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते.

loading image