esakal | प्रतिकूल स्थितीमुळे आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

stock market

प्रतिकूल स्थितीमुळे आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जागतिक शेअरबाजारांमधील प्रतिकूल वातावरणामुळे आज सलग दुसऱ्या दिवशीही भारतीय निर्देशांक सुमारे पाऊण टक्का घसरले. नियामकांच्या चौकशीच्या कथित वृत्ताचे खंडन करूनही अदाणी ग्रूपचे (adani group) समभाग आजही गडगडले. आज सेन्सेक्स (sensex) 354 अंशांनी घसरून 52,198 अंशावर स्थिरावला, तर 120 अंशांनी घसरलेला निफ्टी (nifty) 15,632 अंशांवर बंद झाला. (stock market fell second day row today due unfavorable conditions)

कालही अमेरिकी शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्याने सकाळी आशियायी शेअर बाजारांनीही तोच मार्ग धरला. त्यामुळे भारतातही घसरण स्वाभाविकच होती. आज दिवसभरा दरम्यान सेन्सेक्स तर 52 हजारांपर्यंत आला होता, मात्र नंतर तो सावरला. काल कोसळलेल्या एचडीएफसी बँकेची घसरण आजही कायम राहिली व तो समभाग 27 रुपयांनी घसरून 1443 वर स्थिरावला. आज उर्जा, धातू, आरोग्य वाहन, बँका या सर्व क्षेत्रांमधील समभागांचे दर कोसळले.

हेही वाचा: गर्भपातावरील औषधांची अवैध विक्री, राज्यात एकूण 14 गुन्हे दाखल!

बडा गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला याने टाटा मोटर्समधील आपला वाटा 1.29 टक्क्यांवरून 1.14 टक्के एवढा घटवल्याच्या वृत्तामुळे टाटा मोटर्सदेखील आज सहा रुपयांनी घसरून 302 रुपयांवर आला. तर एशियन पेंट्स चे निकाल चांगले आल्यामुळे त्याचा दर 179 रुपये वाढून तो 3,159 वर बंद झाला. इंडसइंड बँक 33 रुपयांनी घसरून 982 रुपयांवर तर टाटा स्टील 33 रुपयांनी घसरून 1,232 रुपयांवर स्थिरावला. एनटीपीसी, एअरटेल (525 रु.), एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक हे समभागही दोन टक्के घसरले. सनफार्मा (676 रु.), लार्सन टुब्रो (1590 रु.) यांचे दरही घसरले.

हेही वाचा: Corona: लसीकरणात राज्याची विक्रमी नोंद, चार कोटींचा टप्पा गाठला!

हिंदुस्था लीव्हर (2,433 रु.), मारुती (7,215 रु.) व टीसीएस (3,205 रु.) यांचे दर वाढत असताना अदाणी ग्रूपच्या समभागांचे दर आजही गडगडले. अदाणी पोर्ट फक्त एक रुपया (बंद भाव 672 रु.) तर अदाणी एंटरप्राईज 14 रुपये (1,366 रु.) घसरला. पण त्यांचे अन्य समभाग चांगलेच घसरले. अदाणी पॉवर पाच टक्के (97 रु.) घसरला तर अदाणी ट्रान्समिशन 48 रुपये (920) घसरला. अदाणी ग्रीन एनर्जी 38 रुपयांनी घसरून 938 रुपयांवर तर अदाणी टोटल गॅस 42 रुपयांनी घसरून 813 रुपयांवर स्थिरावला.

आजचे सोन्याचांदीचे दर

सोने - 48,300 रु.

चांदी - 67,500 रु.

loading image