
Share Market Opening : बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 62,719 वर
Share Market Opening : BSE सेन्सेक्स 186 अंकांच्या वाढीसह 62719 वर उघडला. त्यामुळे निफ्टीमध्ये 51 अंकांच्या वाढीसह 18659 वर व्यापार सुरू झाला आहे. बँक निफ्टी 44,000 च्या वर उघडला. आयटी समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे बँक निफ्टी तेजीत आहे.
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात महागाईचा दर घसरला, त्यानंतर अमेरिकन शेअर बाजार झपाट्याने बंद झाले होते. या संकेतांमुळे आशियाई शेअर बाजारांमध्येही तेजी दिसून येत आहे.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
विदेशी गुंतवणूकदारांच्या बाजूने जबरदस्त खरेदी दिसून आली. विदेशी गुंतवणूकदारांनी 620 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्याच वेळी, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 36.75 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांपासून सातत्याने बाजारात खरेदी केली आहे.
पेटीएमच्या बोर्डाने 850 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकला मान्यता दिली आहे. येस बँकेत परदेशी गुंतवणूकदारांच्या सदस्याच्या नियुक्तीला मंजुरी दिल्यानंतर येस बँकेच्या स्टॉकवरही लक्ष ठेवले जाईल. अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, टीव्हीएस मोटर्सचे शेअर्स चर्चेत आहेत.
हेही वाचा: Credit Card Bill: क्रेडिट कार्ड ड्यु डेट निघून गेली? काळजी करू नका, 'हा' पर्याय वापरून सहज टाळा दंड
कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या पुढे गेली आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील चलनवाढीचा दर घसरल्यानंतर गुंतवणूकदार जोखमीच्या मालमत्तेत गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे कच्च्या तेलाला वेग आला आहे.