Share Market : आज कशी असेल बाजाराची स्थिती! कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

सोमवारी देशांतर्गत बाजारात नकारात्मक कल दिसून आल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विनोद नायर यांचे म्हणणे आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती! कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

सोमवारी प्रचंड अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बाजार सपाट बंद झाला. मेटल आणि पीएसयू बँकांच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव आला. सोमवारी सेन्सेक्स 32.02 अंकांच्या अर्थात 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 60,718.71 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 6.70 अंक अर्थात 0.04 टक्क्यांसह 18,109.45 वर बंद झाला.

सोमवारी देशांतर्गत बाजारात नकारात्मक कल दिसून आल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विनोद नायर यांचे म्हणणे आहे. देशांतर्गत चलनवाढीची नकारात्मक आकडेवारी आणि जागतिक बाजारातून आलेले कमजोर संकेत यांचा परिणाम सोमवारी बाजारावर दिसून आला. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाई दर सप्टेंबरमधील 10.66 टक्क्यांवरून 12.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी या बातमीचा परिणाम बाजारावर दिसून आला.

हेही वाचा: 'हे' 6 मिडकॅप्स शेअर्स देतील भरघोस परतावा, तुमच्याकडे आहेत का?

Share Market

Share Market

भारतीय बाजारांप्रमाणेच, कोविड-19 ची वाढती प्रकरणे आणि पुरवठ्यातील अडचणी असूनही चीनची औद्योगिक उत्पादन वाढ 3.5 टक्क्यांवर पोहोचली आहे, ज्यामुळे जागतिक आर्थिक मंदीची चिंता कमी झाल्याचे विनोद नायर म्हणाले. भारतीय बाजारपेठांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील खरेदी परतल्यामुळे बाजारातील घसरणीवर काही प्रमाणात दबाव राहिला.

तांत्रिक दृष्टिकोन

निफ्टीने डेली स्केलवर लाँग अप्पर सँडोसह एक लहान बियारीश कँडल तयार केली आहे, जी फॉलोअप बाईंगचा पाठपुरावा न केल्यामुळे बाजारातील अस्थिरतेचे संकेत देत असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले,. निफ्टीला 18,200 आणि 18,350 च्या झोनमध्ये जाण्यासाठी 18,000 च्या वर राहावे लागेल, तर खाली, 18000-17900 वर सपोर्ट दिसत आहे.

हेही वाचा: शेअर्स घ्यायचा विचार करताय ? मिडकॅपसाठी 6 दमदार स्टॉक

Share

Share

आज बाजाराची स्थिती कशी असेल ?

आता 20 Day SMA निफ्टीसाठी ट्रेंड निर्णायक म्हणून काम करेल असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चव्हाण म्हणाले. जर निफ्टी त्याच्या वर राहिला तर त्यात 18200-18275 पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 18040 किंवा त्याच्या 20 Day SMA च्या खाली गेला तर तो 18000-17925 ची पातळी पाहू शकतो.

हेही वाचा: म्युच्युअल फंड घ्यावा, की शेअर्स?

Share Market

Share Market

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- पॉवर ग्रीड (POWERGRID)

- ओएनजीसी (ONGC)

- आयटीसी (ITC)

- सिप्ला (CIPLA)

- यूनायटेड फॉस्फरस लिमिटेड (UPL)

- आयआरसीटीसी (IRCTC)

- झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

- अशोक लेलँड (ASHOKLEYLAND)

- एस्कॉर्ट्स (ESCORTS)

- बाटा इंडिया (BATAINDIA)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top