Suger Industries Share : अडीच वर्षात 594% रिटर्न, ही शुगर कंपनी येत्या काळात देईल दमदार परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suger Industries Share

Suger Industries Share : अडीच वर्षात 594% रिटर्न, ही शुगर कंपनी येत्या काळात देईल दमदार परतावा

Suger Industries Share Market : शुगर इंडस्ट्रीजमधील दिग्गज कंपनी त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीजच्या (Triveni Engineering and Industries) शेअर्सनी अवघ्या अडीच वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दमदार वाढ केली आहे. ही कंपनी एका महिन्यात 13 टक्क्यांहून अधिक नफा कमवू शकते असा विश्वास देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एडलवाईसने दिला आहे.

मंगळवारी त्याचे शेअर्स सध्या 0.80 टक्क्यांनी घसरून 273.75 रुपयांवर ट्रेड करत आहेत. एडलवाईसने त्रिवेणी इंजिनिअरिंगला (Triveni Engineering and Industries) बाय रेटिंग देत यासाठी 310 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, तर स्टॉप लॉस 270 रुपयांवर ठेवण्यास सांगितले आहे.

हेही वाचा: Share Market Investment : फक्त 10 दिवसांत या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट

27% डिस्काउंटवर मिळतायत शेअर्स

गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरला त्रिवेणी इंजिनिअरिंगचे शेअर्स 185.65 रुपयांवर ट्रेड करत होते, जे एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. त्यानंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी वाढली आणि ती 101 टक्के मजबूत होउन 19 एप्रिल 2022 रोजी 374 रुपयांच्या किमतीवर पोहोचली. पण, नंतर पुन्हा दबाव दिसून आला आणि तो सुमारे 27 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, आता बाजारातील जाणकारांना त्यात तेजीचा कल दिसत आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरू, सेन्सेक्स 501 अंकानी गडगडला

कंपनी काय करते ?

त्रिवेणी इंजिनिअरिंग ही साखर निर्मितीच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1932 मध्ये झाली. त्रिवेणी इंजिनिअरिंग साखरेशिवाय इंजिनिअरिंग बिझनेस, पॉवर ट्रान्समिशन, वॉटर अँड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट सॉल्यूशंस आणि डिफेन्समध्ये आघाडीवर आहे.

हेही वाचा: Share Market : 34 हजारात गुंतवणुकदार बनले कोट्यधीश, 'या' शेअरचा छप्परफाड रिटर्न

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share Market