Sula Vineyards IPO : सुला वाईनयार्ड्सचा आयपीओ लवकरच, सेबीची मंजूरी

सुला वाईनयार्ड्सचा आयपीओनंतर, बीएसई आणि एनएसईवर लिस्टींगचा प्रस्ताव आहे.
Sula Vineyards IPO
Sula Vineyards IPO esakal

Sula Vineyards IPO : भारतातील सर्वात मोठी वाइन उत्पादक सुला वाईनयार्ड्सला आयपीओद्वारे निधी उभारण्यासाठी सेबीची मान्यता मिळाली आहे. सुलाचा आयपीओ ऑफर फॉर सेल असेल. सुला वाईनयार्ड्सने यावर्षी जुलैमध्ये ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल केले होते. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी या आयपीओसाठी कोऑर्डिनिटिंग लीड मॅनेजर आहे. सुला वाईनयार्ड्सचा आयपीओनंतर, बीएसई आणि एनएसईवर लिस्टींगचा प्रस्ताव आहे.

ओएफएसअंतर्गत ऑफर केल्या जाणार्‍या इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू 2 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केली आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, सीएलएसए इंडिया आणि आयआयएफएल सिक्युरिटीजसारख्या कंपन्या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर KFin Technologies ऑफरचे रजिस्ट्रार आहेत.

Sula Vineyards IPO
Share Market: शेअर बाजारात स्थिरता; सेन्सेक्स 61,319 तर निफ्टी 18,242 अंकावर

स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणारी सुला वाईनयार्ड्स ही वाइन तयार करणारी पहिली कंपनी असेल. त्याच वेळी, अल्कोहोल आणि स्पिरिट्स विभागात आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी असेल. ऑफिसर्स चॉईस व्हिस्की बनवणाऱ्या अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्सनेही या वर्षी आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

Sula Vineyards IPO
Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र थांबलं, सेन्सेक्सची भरारी

सुला ही भारतीय वाइन उद्योगातील सर्वात मोठी वाइन उत्पादक आहे. कंपनीने 1996 मध्ये आपल्या पहिल्या वाईनयार्डची स्थापना केली आणि पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत भारतात अनेक प्रकारच्या वाइन बनवणारी पहिली कंपनी बनली. कंपनीने Sauvignon Blanc, Chenin Blanc, Zinfandel, Riesling, Red Sparkling असे अनेक ब्रँड सादर केले.

Sula Vineyards IPO
Share Market: बाजार तेजीसह सुरू, मात्र आयटीच्या 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण

कंपनीचा महसूल या आर्थिक वर्षात 8.60 टक्क्यांनी वाढून 453.92 कोटीवर पोहोचला. मागील आर्थिक वर्षात हा नफा 417.96 कोटी होता. या कालावधीत कंपनीचा नफा 3.01 कोटी रुपयांवरून 52.14 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com