Sula Vineyards IPO : वाईन कंपनीच्या शेअर्समध्ये कमाईची संधी; गुंतवणूक करणं किती फायद्याचं?

हा आयोपीओ ९६० कोटींचा असून, इश्यू आयपीओची किंमत 340-357 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
Sula Vineyards
Sula VineyardsSakal

Sula Vineyards IPO : महाराष्ट्रातील आघाडीची वाईन निर्मिती कंपनी सुला विनयार्ड्सच्या IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा आयोपीओ ९६० कोटींचा असून, इश्यू आयपीओची किंमत 340-357 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Sula Vineyards
आज सुला वाईनच्या IPO एंट्री; किमती पासून गुंतवणुकीपर्यंत सर्व काही जाणून घ्या

या IPO मध्ये सामान्यांना १४ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार असून, हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर (OFS) आधारित आहे. या अंतर्गत, प्रमोटर, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांना 26,900,532 इक्विटी शेअर्स विकली केली जाणार आहे. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Sula Vineyards
'सुला विनियार्ड'ची कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी एक कोटींची मदत

दीर्घ मुदतीसाठी करा गुंतवणूक

ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजच्या मते, महामारीनंतर FY22 मध्ये सुला विनयार्ड्सने वाईन क्षेत्रातील मजबूत वाढ दर्शविली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीच्या मॅनेजमेंटला हा आयपीओ रेंजबाउंड राहण्याचा विश्वास आहे. मात्र, हाय एसेप्टिबिलिटीमुळे इंडस्ट्रीचा विकास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ब्रोकरेज हाऊस चॉइस ब्रोकिंगच्या मते, सुला विनयार्ड्सचा P/E 38.5 आहे. त्यामुळे ही आकडेवारी वाजवी असल्याचे दिसून येत आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील वाइनचे कमी पेनिट्रेशन, दरडोई उत्पन्नातील वाढ आणि लक्ष्यित लोकसंख्येचा विस्तार या घटकांचा विस्तार लक्षात घेता, या क्षेत्रातील वाढ जलद होईल असा विश्वास ब्रोकरेज हाऊसने व्यक्त केला आहे. त्यामुळे यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

Sula Vineyards
सुला विनियार्डसतर्फे चीनमध्ये वाईन निर्यात,नानजिंग ग्लोरीशी भागीदारी 

सुला व्हाइनयार्ड्सचा आयपीओ पूर्णपणे OFS आधारित असून, या आयपीओच्या गुंतवणुकदारांमध्ये प्रमोटर, संस्थापक आणि कंपनीचे CEO राजीव सामंत, Cofintra, Haystack Investments Ltd., SAMA Capital III, Ltd., SWIP Holdings Ltd., Verlinvest SA आणि Verlinvest France SA सारख्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

लॉट साईज

Sula Vineyards IPO चा लॉट साइज 42 शेअर्सचा आहे. एक किरकोळ गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणुकीसाठी 13 लॉटपर्यंत अर्ज करू शकतो. म्हणजे कमाल 546 शेअर्ससाठी 194,922 रुपये गुंतवले जाऊ शकतात.

'सुला फेस्ट'ची धमाल

कंपनीची आर्थिक स्थिती कशी?

३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या सहामाहीत कंपनीचा नफा रु. 30.51 कोटी इतका नोंदवण्यात आला आहे. जो एका वर्षापूर्वी तिसऱ्या तिमाहीत रु. 4.53 कोटी होता. त्यामुळे कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदारांना तोट्याऐवजी फायदाचा होण्याचा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com