Sula Vineyards IPO: सुला वाईनची IPO एन्ट्री; किंमतीपासून गुंतवणुकीपर्यंत सर्व काही जाणून घ्या

सुला विनयार्ड्स या आघाडीच्या वाइन बनवणाऱ्या कंपनीचा IPO आज खुला झाला आहे.
Sula Vineyards IPO:
Sula Vineyards IPO: sakal

Sula Vineyards IPO: आठवड्यातील पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. त्यानंतर बाजार आता वेगाने सावरत आहे. आज एका नवीन कंपनीने IPO आणला आहे. सुला विनयार्ड्स या आघाडीच्या वाइन बनवणाऱ्या कंपनीचा IPO आज खुला झाला आहे.

आयपीओचा आकार 960 कोटी रुपये आहे. तर इश्यूसाठी किंमत 340-357 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा IPO 14 डिसेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित आहे. या अंतर्गत, कंपनी, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांद्वारे एकूण 26,900,532 इक्विटी शेअर्स विकले जातील.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

देशांतर्गत बाजारपेठेत वाइन कंपन्या कमी आहेत. त्यात देशातील दरडोई उत्पन्नात वाढ आणि वाढती लोकसंख्या इ. घटकांचा विस्तार पाहता, या क्षेत्रातील वाढ मोठ्या प्रमाणावर होईल असा विश्वास ब्रोकरेजला वाटतो. सुला ही देशातील आघाडीची वाइन निर्माता आणि विक्रेते कंपनी आहे. कंपनीला याचा फायदा होणार आहे.

Sula Vineyards IPO चे लॉट साइज 42 शेअर्स आहे. एक किरकोळ गुंतवणूकदार 13 लॉटपर्यंत अर्ज करू शकतो. म्हणजे कमाल 546 शेअर्ससाठी 194,922 रुपये गुंतवले जाऊ शकतात.

Sula Vineyards IPO:
Sula Vineyards IPO : वाईन कंपनीच्या शेअर्समध्ये कमाईची संधी; गुंतवणूक करणं किती फायद्याचं?

सुला कंपनीचे व्हाइनयार्ड्स लाल, पांढर्‍या वाइनमध्ये बाजारात आघाडीवर आहे. सुला व्यतिरिक्त रासा, दिंडोरी, द सोर्स, सातोरी, मदेरा आणि दिया या ब्रँड नावाने वाईन विकते. हे 13 ब्रँडच्या 56 वेगवेगळ्या वाइन तयार करते. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये त्यांच्या मालकीच्या चार आणि दोन उत्पादन कारखाने आहेत. नाशिकची ही वाईन कंपनी देशातील सर्वात वेगाने वाढणारी अल्कोहोलिक कंपनी आहे.

30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या सहामाहीत कंपनीचा नफा अनेक पटींनी वाढून रु. 30.51 कोटी झाला आहे, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत रु. 4.53 कोटी होता. रिलायन्स कॅपिटलची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स कॉर्पोरेट अॅडव्हायझरी सर्व्हिसेसने 2018 मध्ये त्यातील 19.05 टक्के हिस्सा 256 कोटी रुपयांना विकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com