start up
start upstart up

Budget 2022 : स्वदेशी जागरण मंचाच्या रडारवर 'स्टार्टअप्स'

लहान व्यवसायांना प्रोत्साहन देण्याबरोबच इक्विटी समर्थन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयं सेवक संघाशी (RSS) संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंच या संस्थेने स्टार्टअप्समध्ये (Indian Startups) परदेशात नोंदणी करण्याच्या वाढत्या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच किमान 29 भारतीय स्टार्टअप्स आणि फ्लिपकार्ट (Flipkart) सारख्या संस्थांनी परदेशात नोंदणी केल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे भारत सरकारचा महसुलाचे नुकसान होत आहे. त्यामुळे थेट परदेशात नोंदणी करणाऱ्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचाने केली आहे. (Swadeshi Jagran Manch Opposes Direct-Overseas Listings In Indian Startups)

start up
भारताचे अर्थमंत्री अन् थेट पाकिस्तानचे पंतप्रधान; कोण होती ती व्यक्ती?

दरम्यान, स्वदेशी जागरण मंचाने (Swadeshi Jagran Manch) आपल्या पूर्व-अर्थसंकल्पीय शिफारशींमध्ये (Budget 2022) लहान व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत, सरकारला काही वस्तू केवळ लघुउद्योगांद्वारे (Small Industry) उत्पादनासाठी राखीव ठेवण्याचे धोरण परत आणण्याची विनंती केली आहे. तसेच लहान उद्योगांना अधिक रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच लहान व्यवसायांना देखील इक्विटी समर्थन देण्याची मागणी केली आहे.

start up
चाबहार बंदर : भारताने केलं 'पाक'ला बायपास, शोधला नवा मार्ग

मोठ्या प्रमाणावर आयात (Imported Items) केलेल्या वस्तूंच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पीएलआय योजनेव्यतिरिक्त विशेष प्रोत्साहन देण्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत मंचातर्फे व्यक्त करण्यात आले असून, रोजगार निर्मितीला (Job Openings ) प्रोत्साहन देण्यासाठी सरकार लघुउद्योग (Small Industries ) आणि शेतकर्‍यांना कामावर ठेवण्यासाठी मनरेगाची (MNREGA) व्याप्ती वाढवू शकते, असा देखील सल्ला स्वदेशी जागरण मंचातर्फे देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com