RD vs SIP : जास्त रिटर्न नेमके कशात? RD मध्ये की SIP मध्ये; जाणून घ्या सोप्या शब्दांत

गुंतवणूक कशात करावी हे गुंतवणुकदाराच्या जोखमीवर अवलंबून असते.
RD vs SIP
RD vs SIPsakal

Investment Planning : सध्या बाजारामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय समोर आले आहेत. पण बहुतेक लोक आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करतात. ज्यामध्ये दर महिन्याला पैसे जमा केल्यानंतर पाच वर्षांनी चांगला परतावा मिळतो. कमी जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे, परंतु जर तुम्ही जोखीम पत्करू शकत असाल आणि अधिक परतावा हवा असेल तर स्टॉक मार्केटमधील पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) तुमच्यासाठी अधिक चांगली ठरू शकते. सध्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात SIP द्वारे 13041 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

कुठे गुंतवणूक करणे योग्य असेल?

आवर्ती ठेवी ही एक सरकारी गुंतवणूक योजना आहे, जी गुंतवणूकदारांना चांगला परतावा देते. यासोबतच करात सूट आणि इतर फायदेही देण्यात या योजनेतून देण्यात आले आहेत. तर एसआयपी (SIP) म्युच्युअल फंड अंतर्गत येते आणि दर महिन्याला किंवा ठराविक अंतराने त्यात पद्धतशीरपणे गुंतवणूक केली जाऊ शकते.

आरडी स्कीम आणि एसआयपीमध्ये मासिक किंवा त्रैमासिक आधारावर गुंतवणुक करता येते आणि त्यांची मॅच्युरिटी पाच वर्षांसाठी असते. याशिवाय, या दोन्ही योजना केव्हाही बंद केल्या जाऊ शकतात आणि काही अटींनुसार पैसे गुंतवणूकदारांना परत केले जातात. त्यात नियमित गुंतवणूक न केल्यास खाते कधीही बंद होऊ शकते आणि गुंतवणूक पुन्हा सुरू करावी लागू शकते.

RD vs SIP
RBI Ban Paytm App : RBI चा Paytm ला मोठा धक्का; 'या' ॲपवर घातली बंदी

एक गुंतवणूकदार RD योजनेत जोखीम न घेता 5.8 ते 7 टक्के वार्षिक व्याजाने गुंतवणूक करू शकतो. SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सरासरी 12 टक्के व्याज मिळू शकते. यामध्ये जर बाजाराची स्थिती चांगली असेल तर दीर्घ मुदतीसाठी 15 ते 18 टक्के व्याज देखील मिळू शकते. म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूक चांगली आहे कारण त्यावर चक्रवाढ व्याज दिले जाते.

जर तुम्ही RD आणि SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात दरमहा 5 हजार रुपये जमा करत असाल तर पाच वर्षांत एकूण 3 लाख रुपये जमा होतील. आरडीमध्ये 7 टक्के कमाल व्याजावर, फक्त 59,663 रुपये व्याज म्हणून जमा केले जातील, म्हणजेच एकूण रक्कम 3 लाख 59 हजार 663 रुपये खात्यावर जमा करायची. एसआयपीच्या बाबतीत, सरासरी 12 टक्के परताव्यावर व्याज 1 लाख 12 हजार 432 रुपये होते आणि एकूण रक्कम 4,12,432 रुपये खात्यावर जमा होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com