बॅंकांनो, कुपया तुमचे सर्व पैसे परत घ्या' : विजय मल्ल्याची विनंती

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

लंडन : आर्थिक फरार गुन्हेगार विजय मल्ल्याने भारतीय बॅंकांना सर्वच्या सर्व म्हणजे 100 टक्के मुद्दल परत घेण्याची विनंती केली आहे. इंग्लंडच्या उच्च न्यायालयात सुरू असलेल्या तीन दिवसीय अपील सुनावणीच्या शेवटी मल्ल्याने भारतीय बॅंकांना ही विनंती केली आहे. मल्ल्याचे भारतात हस्तांतरण करण्यासंदर्भात इंग्लंडच्या न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड कारा ई-सकाळचे ऍप

विजय मल्ल्या किंगफिशर एअरलाईन्सचे माजी प्रमुख आहेत. 64 वर्षाच्या विजय मल्ल्यावर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे 9,000 कोटी बुडवल्याचा आरोप आहे. मी सर्व बॅंकांना 100 टक्के मुद्दल परत घेण्याची विनंती करतो, असे वक्तव्य विजय मल्ल्याने लंडनच्या रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टीसच्या बाहेर आल्यावर केले आहे. सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) मी कर्जाची परतफेड करत नसल्याची तक्रार बॅंकांनी दाखल केल्यानंतर माझी मालमत्ता जप्त केली होती. मी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अॅक्ट अंतर्गत कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे ईडीने तात्काळ माझी मालमत्ता मोकळी करावी, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.

अर्थविश्वच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आणखी वाचा - या आयटी कंपनीत होणार मेगा भरती

भारत सरकारच्या वतीने क्राऊन प्रोसेक्युशन सर्व्हिस (सीपीएस) इंग्लंडच्या न्यायालयात खटला लढवते आहे. एप्रिल 2017 मध्ये विजय मल्ल्याला हस्तांतरणाच्या वॉरंटवर अटक करण्यात आली होती. त्यानंतर मल्ल्याने 6,50,000 पौडांच्या बॉंडवर आणि प्रवासातील निर्बंधाच्या अटीवर जामीन मिळवला होता. मी बॅंकांना सांगतो आहे की तुमचे पैसे परत घ्या आणि ईडी म्हणते आहे की या मालमत्तांवर आमचा अधिकार आहे. म्हणजे एका बाजूने ईडी आणि दुसऱ्या बाजूने बॅंका एकाच मालमत्तेसाठी संघर्ष करत आहेत, असेही मल्ल्याने सांगितले. भारतात परतण्यासंदर्भात विचारले असता मल्ल्या म्हणाला, माझे कुटुंब जिथे असेल तिथेच मीसुद्धा असलो पाहिजे. जर सीबीआय आणि ईडी यांनी समजूतीने कारवाई पुढे नेली तर या प्रकरणाचे चित्रच बदलून जाईल. ते माझ्याबरोबर मागील चार वर्षांपासून ज्या पद्धतीने वागत आहेत ते अयोग्य आहे, असे पुढे मल्ल्या म्हणाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: take your money vijay mallya request banks