टाटाची Altroz Turbo लवकरच होणार लाँच

tata
tata

नवी दिल्ली - टाटाची अल्ट्रोज टर्बो जानेवारी 2021 मध्ये लाँच करण्यात येणार आहे. टाटाची ही कार बाजारात कधी येणार याची उत्सुकता लागून राहिली होती. कंपनीने या कारमध्ये त्यांच्या लोकप्रिय अशा Nexon कारचं इंजिन वापरलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ही कार टेस्टिंगवेळी दिसली होती. कंपनी या कारला 13 जानेवारीला लाँच करण्याची तयारी करत आहे. Tata Altroz Turbo ची स्पर्धा थेट ह्युंडाईच्या  Grand i10 NIOS Turbo आणि Volkswagen Polo TSI सोबत असणार आहे. 

Tata Altroz Turbo च्या लूकमध्ये जास्त बदल करण्यात आलेला नाही. सध्याच्या कारप्रमाणेच ही कार दिसणार आहे. मात्र टाटा नव्या Altroz Turbo ला अनेक रंगांच्या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. यामुळे आधीपेक्षा ही कार जास्त आकर्षक दिसेल. टाटा अल्ट्रोज टर्बोच्या इंटिरिअरमध्ये थोडे बदल पाहण्यास मिळू शकतात.

टाटाने या कारमध्ये त्यांच्या SUV Nexon petrol कारचं इंजिन वापरलं आहे. यामुळे Tata Altroz Turbo ला जबरदस्त ताकद मिळेल. टाटाच्या Nexon Petrol चे इंजिन 5500rpm वर 109bph  या क्षमतेनं 140Nm इतकं पिक टॉर्क जनरेट करते. तसंच या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सही मिळेल. कंपनी या कारला XT, XT(O), XZ आणि XZ(O) अशा 4 ट्रिममध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. 

कारची फिचर्स पाहता टाटा अल्ट्रोज टर्बो हॅचबॅक कार्सच्या सेगमेंटमध्ये आघाडीवर असेल. त्यामुळे या कारची किंमतही तशीच असू शकते. अंदाजे ही कार बाजारात 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होईल असं म्हटलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com