कोरोना संकटातसुद्धा टाटा पाळणार आपला 'हा' शब्द

पीटीआय
Saturday, 30 May 2020

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटात उद्योगांना कामगार कपात, वेतन कपातीसारखे निर्णय घ्यावे लागत आहेत. मात्र अशा परिस्थितीतदेखील टाटा समूह दिलेला शब्द पाळणार आहे. टाटा स्टीलने ज्या उमेदवारांनी नोकरीची ऑफर दिली होती, त्यांना नियोजित वेळेत सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती टाटा स्टीलने दिली आहे. 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटात उद्योगांना कामगार कपात, वेतन कपातीसारखे निर्णय घ्यावे लागत आहेत. मात्र अशा परिस्थितीतदेखील टाटा समूह दिलेला शब्द पाळणार आहे. टाटा स्टीलने ज्या उमेदवारांनी नोकरीची ऑफर दिली होती, त्यांना नियोजित वेळेत सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती टाटा स्टीलने दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

टाटा स्टीलने एप्रिल आणि मे महिन्यात ९६ अधिकाऱ्यांच्या (यात मॅनेजमेंट ट्रेनीसुद्धा आहेत) भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली होती. जून महिन्यातदेखील याच पद्धतीने आणखी २५ अधिकाऱ्यांची भरती करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. विविध प्रकल्पांसाठी टाटा स्टीलने ७६ इंटर्नचीदेखील भरती केली आहे. तर पुढील काही आठवड्यात आणखी ९० तांत्रिक इंटर्न कंपनीत रुजू होणार आहेत, अशी माहिती एका इंग्रजी संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 

अनिल अंबानींच्या रिलायन्स नेव्हलच्या लिलावाची प्रक्रिया 

टाटा समूह आपल्या सामाजिक कार्य आणि उपक्रमांसाठीसुद्धा ख्यातनाम आहे. टाटा स्टीलने जमशेदपूर, कलिंगानगर आणि इतर खाणींमध्ये काम करण्यासाठी १२ डॉक्टर्सचीदेखील भरती केली आहे. त्याशिवाय जमशेदपूर येथील आपल्या उत्पादन प्रकल्पात टाटा स्टीलने ३,००० नव्या कामगारांची भरती केली आहे. नव्या कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगसंदर्भात कंपनीने बदल केले आहेत कारण बहुतांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. उत्पादन प्रकल्पात सध्या कंपनीचे ४० टक्के मनुष्यबळ कार्यरत आहेत. 

गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

प्रत्येक नवा कर्मचारी एक दिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रमात सहभागी होतो. यामध्ये वेबिनार आणि इतर संवादाद्वारे वरिष्ठ नेतृत्व नव्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत असते. वरिष्ठ अधिकारी नव्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून नियमितपणे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती टाटा स्टीलचे मनुष्यबळ विभागाचे उपाध्यक्ष सुरेश त्रिपाठी यांनी दिली आहे.

* टाटा स्टीलने एप्रिल आणि मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने केली अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया  
* ३,००० नव्या कामगारांची भरती
* जमशेदपूर, कलिंगानगर आणि इतर खाणींमध्ये काम करण्यासाठी १२ डॉक्टर्सचीदेखील भरत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tata steel promises to to offer jobs to new recruites