HDFC Bank : दुसऱ्या दिवशी ऑनलाईन सेवांमध्ये बिघाड; खातेधारकांना मन:स्ताप!

टीम ई-सकाळ
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

याआधी देखील एचडीएफसीने नवीन मोबाईल अॅप आणले होते, तेव्हाही ग्राहकांना याच प्रकारे अडचणींचा सामना करावा लागला होता.

नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

बँकिंग अॅप वापरता येत नसल्याने सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला. महिन्याच्या सुरुवातीला तांत्रिक अडचण आल्याने लोकांना बिलांचा भरणा आणि अन्य व्यवहारात अडचणी येत आहेत. 

- प्रत्यक्ष करसंकलनात पाच टक्के वाढ - सीतारामन

एचडीएफसी बँकेच्या नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग अॅपमध्ये सोमवारी बिघाड झाला.  एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली की, तांत्रिक कारणास्तव नेटबँकिंग सेवा काही काळ बंद झाली आहे. बिघाडाची कल्पना आम्ही ग्राहकांना आधीच दिली होती.

- मोबाईल कंपन्यांची दरवाढ

'तांत्रिक बिघाडामुळे आमचे काही ग्राहक नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग अॅप लॉगइन करू शकत नाहीएत. आमचे तज्ज्ञ हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी काम करत आहेत आणि तुम्हाला लवकरच सेवा पूर्ववत करून देण्यात येईल.' असे बँकेच्या ट्विटमध्ये सांगण्यात आले.  

- मारुती सुझुकीची वाहने घेताय? तर मग हे वाचाच!

याआधी देखील एचडीएफसीने नवीन मोबाईल अॅप आणले होते, तेव्हाही ग्राहकांना याच प्रकारे अडचणींचा सामना करावा लागला होता. नवे मोबाइल अॅप सादर केल्यानंतर बँकेने जुना अॅप गुगल प्ले स्टोरवरून काढून टाकले होते, यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technical snag hits HDFC banks net banking and mobile apps for over 24 hours