Share Market : मोठ्या घसरणी नंतर शेअर बाजार सावरला! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

मोठ्या घसरणी नंतर शेअर बाजार सावरला! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

मंगळवारच्या पडझडीनंतर शेअर बाजारात (Share Market) तेजी परतली. विदेशी बाजारातून खराब संकेत मिळूनही भारतीय बाजार हिरव्या रंगात अर्थात तेजीसह उघडला आणि दिवसभर ही तेजी कायम राहिली. बीएसईच्या सर्व क्षेत्र निर्देशांकांमध्ये खरेदी झाली. मेटल (Metal), आयटी (IT) आणि रियल्टी शेअर्समध्ये (Realty shares)सर्वाधिक वाढ झाली.

Share Market

Share Market

मिडकॅप (Midcap) आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये (Smallcap shares)खरेदी झाली. निफ्टी (Nifty)बँकेतही 6 दिवसांच्या घसरणीनंतर वाढ दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) 497 अंकांनी वाढून 56,319 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 157 अंकांनी वाढून 16,771 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 168 अंकांनी वाढून 34,608 वर बंद झाला. तर मिडकॅप 370 अंकांनी वाढून 29,208 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्सची खरेदी झाली. त्याचवेळी निफ्टीच्या 50 पैकी 39 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 7 शेअर्सची खरेदी झाली. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया 31 पैशांनी मजबूत होऊन 75.60 वर बंद झाला आहे.

निफ्टीने डेली स्केलवर डोजी कँडल (Doji Candle)तयार केली असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. मंगळवारी 150 अंकांच्या वाढीसह त्याच्या सुरुवातीच्या पातळीजवळ बंद झाली. निफ्टी 17000 च्या खाली राहिला तर आणखी कमजोरी पाहू शकतो आणि निफ्टी 16,500 च्या दिशेने जाऊ शकतो. वरच्या बाजूस, 17000-17200 वर रझिस्टेंस (Resistance) दिसत असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले.

Share Market

Share Market

आज बाजार कसा राहील जाणून घेऊया

महत्त्वाच्या जागतिक बाजारातील रिकव्हरीमुळे मंगळवारी भारतीय बाजारांमध्ये चांगली पुलबॅक रॅली दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. ही पुलबॅक रॅली असूनही, निफ्टीने डोजी कॅंडलस्टिक पॅटर्न तयार केल्यामुळे बाजार कमजोर राहू शकतो. निफ्टीने इंट्राडे चार्टवर पुलबॅक रॅलीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. मध्यम पुलबॅक रॅलीनंतर बाजार आता 16,600-16,950 च्या रेंजमध्ये कंसोलिडेटड होऊ शकतो असेही ते म्हणाले.

ओमिक्रोन (Omicron) जगभरातील बाजारपेठांवर परिणाम होत आहे. येत्या काळात त्याचा बाजारावर परिणाम होत राहील अशी शक्यता आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांकडे पाहिल्यास, फक्त आयटी सेक्टर असा आहे की तो ताकदीने वर जात असल्याचे दिसते. आता जर निफ्टीमध्ये तेजी आल्यास त्याला वरच्या बाजूने 17000 -17150 च्या झोनमध्ये रझिस्टेंस असेल असेही ते म्हणाले.

share market

share market

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- एचसीएल टेक (HCLTECH)

- विप्रो (WIPRO)

- यूनायटेड फॉस्फरस लिमिटेड (UPL)

- टाटा स्टील (TATA STEEL)

- अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

- एसआरएफ लिमिटेड (SRF)

- एनआयआयटी टेक्नोलॉजीज (COFORGE)

- ए यू बँक (AUBANK)

- एल. अँड टी. टेक्नोलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

- एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स (L&TFH)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.