अमेरिका अन् युरोपने रशियाला SWIFT मधून काढलं बाहेर! काय होणार परिणाम?

रशियाला कमकुवत करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनी मोठी पावले उचलली आहेत.
Society for Worldwide Interbank Financial Telecommunication
Society for Worldwide Interbank Financial Telecommunicationesakal
Summary

रशियाला कमकुवत करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनी मोठी पावले उचलली आहेत.

रशियाला कमकुवत करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनी मोठी पावले उचलली आहेत. अनेक रशियन बँकांना SWIFT वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. SWIFT चा अर्थ आहे - सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन ( Society for Worldwide Interbank Financial Telecommunication) त्याला थोडक्यात SWIFT म्हणतात. स्विफ्टमधून रशियाला बाहेर काढणे हे अमेरिका आणि युरोपचे सर्वात कठीण पाऊल मानले जात आहे. या निर्णयामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन अस्वस्थ झाले आहेत. SWIFT म्हणजे काय, यातून बाहेर पडल्याने रशियावर किती परिणाम होईल, जाणून घेऊया.

Society for Worldwide Interbank Financial Telecommunication
LIC चे शेअर्स स्वस्त दरात हवे आहेत? 28 फेब्रुवारीपूर्वी करा हे काम

SWIFT म्हणजे काय?

SWIFT हे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय पेमेंट गेटवे आहे. रशियन बँका यापुढे या गेटवेचा वापर करू शकणार नाहीत. रशियाला आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेपासून वेगळे करण्यासाठी अमेरिका आणि युरोपने हे पाऊल उचलले आहे. स्विफ्टमधून हकालपट्टीच्या निर्णयामुळे पुतिन यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. यामुळेच त्यांना अण्वस्त्रांच्या वापराविरोधात इशारा देण्यात आला आहे.

स्विफ्ट रशियासाठी किती महत्त्वाचे आहे?

रशियासाठी स्विफ्ट अतिशय महत्त्वाच आहे. कारण रशिया हा जगाला ऊर्जा पुरवठा करणारा प्रमुख देश आहे. ते अनेक देशांना अब्जावधी डॉलर्सचे तेल आणि गॅस निर्यात करतात. त्याचे पेमेंट मिळवण्यासाठी रशिया SWIFT हा प्लॅटफॉर्म वापरतो. हा पेमेंटचा एक अतिशय सोपा मोड आहे. यात, रियल टाइममध्ये ट्रांझॅक्शन पूर्ण होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा प्लॅटफॉर्म अतिशय सुरक्षित मानला जातो. त्यातून वेगळे होणे म्हणजे आर्थिक व्यवस्थेपासून वेगळे होणे असे सरळ सरळ अर्थ निघतो.

Society for Worldwide Interbank Financial Telecommunication
शेअर बाजारात आज कशी असेल स्थिती ? हे ठरू शकतात टॉप 10 शेअर्स

रशियावर कसा परिणाम होईल?

रशियन बँकांना SWIFT पासून वेगळे केल्याने रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासह, रशियाला जगातील पेमेंट प्राप्त करण्यासाठी आणि देण्यासाठी इतर मार्गांचा वापर करावा लागेल. यामुळे व्यवहार पूर्ण होण्यास बराच वेळ लागेल. याचा परिणाम रशियाच्या इतर देशांसोबतच्या व्यापारी संबंधांवर होणार आहे. विशेषत: ऊर्जा पुरवठ्याच्या बाबतीत मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळेच रशियाच्या चलनावर याचा मोठा परिणाम होणार आहे. याचा परिणाम म्हणून रुबलमध्ये 30 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Society for Worldwide Interbank Financial Telecommunication
5 वर्षात दिला 500 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का 'हे' शेअर्स?

स्विफ्ट कसे काम करते?

SWIFT चा वापर जगातील 200 देश आणि 11,000 बँका करतात. हे पैसे ट्रांसफरमध्ये मिडलमॅनची भूमिका पार पाडतात. ते ट्रांझॅक्शन डिटेल्सची तपासणी करतात. यासाठी तो फायानंशियल मॅसेजिंग सर्व्हीसेज वापरतो. तपासणी केल्यानंतर, ट्रांझॅक्शन पूर्ण होते. स्विफ्टचे कार्यालय बेल्जियममध्ये आहे. 11 प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून त्याचे मॉनिटरिंग केले जाते. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

सध्या काहीच रशियन बँकांवर बंदी

सध्या, फक्त काही रशियन बँकांना SWIFT वापरण्यापासून थांबवले गेले आहे. अमेरिका आणि युरोपने अद्याप सर्व रशियन वित्तीय संस्थांना या कक्षेत समाविष्ट केलेले नाही. रशियाने आपली मनमानी चालू ठेवली तर बाकीच्या बँका आणि फायनांशियल इंस्टीट्यूशंस याच कक्षेत आणल्या जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com