तुमचा पोर्टफोलिओ मजबूत करतील 'हे' 6 मिडकॅप शेअर्स!

मिडकॅप शेअर्समध्ये सध्या चांगली अॅक्शन बघायला मिळत आहे.
Stock
Stocksakal
Summary

शॉर्ट टर्मच्या तुलनेत लाँग टर्ममध्ये ते गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात.

Best Midcap Stocks : मिडकॅप शेअर्समध्ये सध्या चांगली अॅक्शन बघायला मिळत आहे. गेल्या वर्षी बीएसईवरील मिडकॅप निर्देशांकात सुमारे 40 टक्क्यांची तेजी दिसून आली होती. या वर्षीही मिडकॅपमध्ये तेजी आहे. मोठ्या रॅलीनंतरही, बाजारात अशा अनेक मिडकॅप्स आहेत, ज्यांचे व्हॅल्युएशन खूप आकर्षक आहे. त्यांचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. शॉर्ट टर्मच्या तुलनेत लाँग टर्ममध्ये ते गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात. मिडकॅपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही चांगल्या शेअर्सच्या शोधत असाल, तर आजची लिस्ट तयार आहे. यात ABB, Datamatics, Schneider Electric, Rallis India, India Pesticides आणि J&K Bank सारख्या शेअर्सचा समावेश आहे.

Stock
मिडकॅप शेअर्ससोबत पोर्टफोलिओ बनवा तगडा! तज्ज्ञांकडून 6 शेअर्सची लिस्ट

शेअर बाजार तज्ज्ञ सिमी भौमिक

लॉन्ग टर्म : ABB

शेअर बाजार तज्ज्ञ सिमी भौमिक यांनी दीर्घ मुदतीसाठी ABB मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 2600 रुपये आणि 2850 रुपये असे 2 टार्गेट देण्यात आले आहेत. तर स्टॉप लॉस 2180 रुपयांच्या खाली ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये मोठी तेजी अपेक्षित आहे.

पोझिशनल: डेटामॅटिक्स (Datamatics)

शेअर बाजार तज्ज्ञ सिमी भौमिक यांनी डेटामॅटिक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 385 रुपये, 410 रुपये आणि 425 रुपये असे 3 टार्गेट देण्यात आले आहेत. तर स्टॉप लॉस 340 रुपयांवर ठेवण्याचा सल्ला दिलाय. यात नुकताच ब्रेकआऊट पाहायला मिळाला. लवकरच तो 1 वर्षाचा उच्चांक गाठू शकतो.

शॉर्ट टर्म : श्नाइडर इलेक्ट्रिक (Schneider Electric)

सिमी भौमिक यांनी शॉर्ट टर्मसाठी श्नाइडर इलेक्ट्रिकवर (Schneider Electric) खरेदी कॉल आहे. या शेअरसाठी 140 रुपये आणि 155 रुपये असे 2 टार्गेट देण्यात आले आहेत. तर 104 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिलाय.

Stock
स्मार्ट गुंतवणूक : म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करण्याची कला

शेअर बाजार तज्ज्ञ आशिष कुकरेजा

लॉन्ग टर्म: रॅलिस इंडिया (Rallis India)

शेअर बाजार तज्ज्ञ आशिष कुकरेजांनी रॅलिस इंडियामध्ये लॉन्ग टर्ममध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 550 रुपये आणि 575 रुपये अशी 2 टार्गेट्स देण्यात आली आहेत. ही टाटा समूहाची कंपनी आहे. त्यांचे मॅनेजमेंट मजबूत आहे. कंपनीची कामगिरी चांगली झाली आहे. कंपनीचे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क मजबूत आहे.

पोझिशनल: इंडिया कीटकनाशके (India Pesticides)

आशिष कुकरेजांनी इंडिया पेस्टिसाइड्सची (India Pesticides) पोझिशनल पिक म्हणून निवड केली आहे. या शेअरसाठी 500 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. कंपनीचा बिझिनेस कॅश जेनरेट करायचा आहे. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासंदर्भातील घोषणांचा फायदा होऊ शकतो.

Stock
"पोर्टफोलिओ'साठी लगबग

शॉर्ट टर्म: जे अँड के बँक (J&K Bank)

आशिष कुकरेजा यांनी J&K बँकेत शॉर्ट टर्मसाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. बँकिंग क्षेत्र यावर्षी चांगले दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे या स्टॉकमध्ये येत्या काळात चांगली तेजी येईल असे ते म्हणाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com