या मल्टीबॅगर स्टॉकचा एका वर्षात 172% परतावा, गुंतवणूकदारांना मिळणार बोनस शेअर्स.. |Multibagger Stock | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Multibaggers

या मल्टीबॅगर स्टॉकचा एका वर्षात 172% परतावा, गुंतवणूकदारांना मिळणार बोनस शेअर्स..

कॉस्मो फिल्म्स (Cosmo Films) लवकरच त्यांच्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर जारी करणार आहे. नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या बैठकीत 1:2 च्या प्रमाणात बोनस इक्विटी शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्यासाठी शेअरधारकांच्या पुढील मंजुरी घेणे बाकी आहे. बोनस शेअर्ससाठी पात्र भागधारक (Eligible Shareholders) निश्चित करण्यासाठी तारीख नंतर कळवली जाईल असे कंपनीने म्हटले आहे. (This multibagger stock will give you 172 percent returns in one year)

हेही वाचा: गुंतवणूकीची सुवर्णसंधी सोडू नका, ऐका तज्ज्ञांचा सल्ला...

एका वर्षात 172% परतावा

कॉस्मो फिल्म्सच्या (Cosmo Films) स्टॉकने गेल्या एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना सुमारे 172 टक्के परतावा दिला आहे. 2022 मध्ये स्टॉकने 33 टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या एक महिन्यापासून या शेअरवर नफावसुलीचा अर्थात प्रॉफिट बुकींगचा दबाव होता आणि त्यामुळेच यात सुमारे 9 टक्क्यांची घसरण झाली आहे.

बोर्डाची मान्यता

कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रति इक्विटी शेअर दोन बोनस शेअर्स देण्यास मान्यता देण्यात आल्याचे कॉस्मो फिल्म्सने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. यासाठी, आता पोस्टल बॅलेटमधून शेअरधारकांच्या इतर आवश्यक मंजूरी घेणे बाकी आहे

हेही वाचा: Delhivery IPO आजपासून गुंतवणूकीसाठी खुला, सब्सक्रिप्शन घ्यायचे का? एक्सपर्ट काय सांगतात पाहूयात

कंपनीचे नाव बदलण्याची शिफारस

मंडळाने कंपनीचे नाव “Cosmo Films Limited” वरून “Cosmo First Limited” असे बदलण्याची शिफारसही केली आहे, ज्यावर भागधारकांची मंजूरी घेणे बाकी आहे. Cosmo Films ही भारतातील BOPP चित्रपट निर्माता, पुरवठादार आणि निर्माता आहे. 1981 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. Cosmo Films हे पॅकेजिंग, लॅमिनेशन आणि लेबलिंग ऍप्लिकेशन्ससाठीची आघाडीची कंपनी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: This Multibagger Stock Will Give You 172 Percent Returns In One Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top