यशस्वी गुंतवणुकीसाठी लक्षात घ्या 'हा' मंत्र

विजय तावडे
Friday, 29 May 2020

प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीच्या परताव्याची चिंता असते. केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळावा हीच अपेक्षा प्रत्येक गुंतवणूकदाराची असते. यासाठी योग्य गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करून संपत्ती निर्मितीचा प्रयत्न केला जातो. मात्र बऱ्याचवेळा गुंतवणूकदारांनी चांगली गुंतवणूक करूनसुद्धा अपेक्षित किंवा उत्तम परतावा मिळत नाही. यासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊया,

प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीच्या परताव्याची चिंता असते. केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळावा हीच अपेक्षा प्रत्येक गुंतवणूकदाराची असते. यासाठी योग्य गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करून संपत्ती निर्मितीचा प्रयत्न केला जातो. मात्र बऱ्याचवेळा गुंतवणूकदारांनी चांगली गुंतवणूक करूनसुद्धा अपेक्षित किंवा उत्तम परतावा मिळत नाही. यासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊया,

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१.याचे कारण आहे गुंतवणूकदारांची मानसिकता. गुंतवणूकीसाठी फक्त आर्थिक बाबी किंवा गुंतवणूक विषयाचे ज्ञानच पुरेसे नसते. गुंतवणूकसंदर्भात गुंतवणूकदाराची मानसिकता किंवा त्यांची भावनिक स्थिती त्याहून महत्त्वाची असते. गुंतवणूक करताना जर पुरेसे ज्ञान नसेल तर नेहमी आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखालीच गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते. 

शेअर बाजारातील तेजीला ब्रेक

२. परंतु फक्त आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक करून फळ हाती येत नाही. कारण बहुतांश गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यापूर्वी तर चर्चा करतात, माहिती घेतात, सल्लागाराचे मार्गदर्शन घेतात. मात्र गुंतवणूक काढून घेताना घाईघाईने भावनिक पातळीवर फारसा विचार न करता निर्णय घेतात. परिणामी त्यांना त्यांच्या गुंतवणूकीवर उत्तम परतावा मिळत नाही. 

कोरोनानंतरचं जग कसं असेल? अशी असेल उद्योगधंद्याची स्थिती

३. जे गुंतवणूक प्रकार निश्चित परतावा किंवा फिक्स्ड इन्कम प्रकारात येतात तिथे तर गुंतवणूकदाराच्या भावनिक निर्णयांचा फारसा परिणाम होत नाही. कारण तिथे निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक झालेली असते. उदाहरणार्थ बॅंकेच्या मुदतठेवी, बॉंड्स इत्यादी. मात्र ज्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूकीच्या निश्चित कालावधीचे बंधन गुंतवणूक प्रकाराकडून नसते, तिथे गुंतवणूकदार भावनिकरित्या विचार करत चुकीचे निर्णय घेताना दिसतात. असा महत्त्वाचा गुंतवणूक प्रकार म्हणजे इक्विटी. यात शेअर बाजारातील शेअरमधील गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंडाच्या इक्विटी प्रकारातील गुंतवणूकीचा समावेश होतो. 

महत्त्वाची बातमी : आता 10 मिनिटांत मिळवा 'पॅन'

४. इक्विटी प्रकारातील गुंतवणूक ही सर्वाधिक परतावा देणाऱ्या आणि सर्वाधिक जोखीम असणाऱ्या गुंतवणूक प्रकारांपैकी एक आहे. या प्रकारात तत्कालीन परिस्थितीचे, देशांतर्गत अर्थव्यवस्था, राजकीय स्थिती, उद्योग-धंद्याची स्थिती, आंतरराष्ट्रीय घटक आणि यासारख्या विविध घटकांचा सातत्याने परिणाम होत असतो. त्यामुळे यात सतत चढउतार होत असतात. परिणामी तेजी असताना तर गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात मात्र मंदी किंवा घसरण सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदार चिंताग्रस्त होतात, आणि गुंतवणूक काढून घेतात.

५. नेमका हाच घटक गुंतवणूकीच्या परताव्यावर मोठा परिणाम करतो. इक्विटी सारख्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करताना दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट असेल तरच गुंतवणूक केली पाहिजे किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर गुंतवणूक ही नेहमी दीर्घकालावधीसाठी केली पाहिजे. यामुळे बाजारातील चढ आणि उतार या दोन्ही परिस्थितीतून तुमची गुंतवणूक जात राहते आणि दीर्घकालात सरासरीच्या नियमानुसार तुमची गुंतवणूक फायद्याची ठरते.

६. त्यामुळे गुंतवणूक करताना नेहमी दीर्घकालाचा विचार केला पाहिजे. त्याआधी विविध घटकांमध्ये बाजारात कितीही चढउतार आले तरी चिंताग्रस्त न होता, घाबरून न जाता गुंतवणूकीला हात लावता कामा नये. कोणत्याही अस्थिर मनस्थितीत  वेळेआधीच गुंतवणूक काढून घेता कामा नये.

७. कमी काळासाठीची गुंतवणूक न करणं महत्त्वाचं. थोड्या काळासाठी केलेल्या गुंतवणुकीमध्ये तुमच्या अपेक्षेच्या काळात किंवा अनपेक्षितपणे मार्केटची अवस्था कशी असेल याचा भरवसा नसतो. त्यामुळे कदाचित तुम्हाला तोटा होऊ शकतो. 

८. सद्यस्थितीत बाजार पेचात टाकतो आहे, त्यामुळे एसआयपींच्या माध्यमातून गुंतवणूक करावी. जेव्हा तुम्ही ३ ते ५ वर्ष आणि त्याहून अधिक कालावधीसाठी एसआयपी करता तेव्हा त्या काळात बाजारातीलमधील तेजी आणि मंदीची पातळी यांची सरासरी साधली जाते. अशाप्रकारे तुम्ही बाजारातील अस्थिरतेचा तुमच्या गुंतवणूकीवर होणारा विपरित परिणाम टाळू शकता आणि तुमचा तोटा होण्यापासून स्वत:चा बचाव करू शकता.

९. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक करताना कधीही भावनिक होत निर्णय घेऊ नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tips for successful investments