esakal | सोन्याचा उच्चांक तर चांदीही 75 हजारांवर; जाणून घ्या नवे दर
sakal

बोलून बातमी शोधा

gold

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्यानं विक्रमी किंमत नोंदवली गेली. 

सोन्याचा उच्चांक तर चांदीही 75 हजारांवर; जाणून घ्या नवे दर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्यानं विक्रमी किंमत नोंदवली गेली. दिल्लीतील सराफ बाजारात गुरुवारी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 225 रुपयांनी वाढ झाली. तर चांदीच्या दरातही प्रतिकिलो 1932 रुपयांची वाढ झाली. दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याचा दर आज प्रति 10 ग्रॅम 56 हजार 590 रुपये इतका झाला. सोन्याचा भाव 56 हजार 365 रुपये इतका होता. 

चांदीच्या किंमतीतही गुरुवारी मोठी वाढ झाली. गुरुवारी चांदीचे दर 1932 रुपयांनी वाढले. यामुळे दिल्लीतील सराफ बाजारात चांदी प्रति किलो 75 हजार 755 रुपये इतकी झाली. दर वाढण्याआधी चांदी प्रतिकिलो 73 हजार 823 रुपये इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 2045.70 डॉलर प्रति औंस आणि चांदी 27.57 डॉलर प्रति औंस इतकी होती. तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे आर्थिक विकासाबाबत शंका असल्यानंच सोन्याच्या किंमतीमध्ये ही वाढ दिसून येत आहे. 

हे वाचा - ग्रॅज्युईटीचा पाच वर्षांचा कालावधी, कमी होण्याची शक्यता

सोन्याच्या वायदा बाजारातही गुरुवारी मोठी वाढ झाली. गुरुवारी 257 रुपयांची वाढ होऊन 55 हजार 355 रुपये प्रति 10 ग्रॅम किंमत झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर महिन्यात डिलिव्हरी करण्यासाठी सोन्याची किंमत 257 रुपयांची म्हणजेच 0.47 टक्क्यांनी वाढ होऊन किंमत 55 हजार 355 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचली. यामध्ये 16 हजार 478 लॉटचा व्यवसाय झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोनं 0.46 टक्क्यांनी महागलं असून 2058.70 डॉलर प्रति औंस इतका दर झाला आहे. 

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्याची किंमत 83 हजारांवर पोहोचण्याची शक्यता
गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चांगला रिटर्न मिळत असल्यानं लोकांचा यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दोन वर्षांत सोन्याने 55 टक्के रिटर्न दिले आहेत. तर S & P 500 ने 11.3%  रिटर्न दिले आहेत. दुसरीकडे सेन्सेक्स जुलै 2018 मध्ये जितका होता त्यापेक्षा आता कमीच आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या सिक्युरिटीने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार 2021 अखेर सोन्याचे दर 3 हजार डॉलर होण्याची शक्यता आहे. भारतीय चलन आणि दर यानुसार तेव्हा सोन्याची किंमत भारतात 83 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होऊ शकते.