एटीएममधून फाटक्या नोटा आल्या तरी नो टेन्शन! अशा बदलून मिळतील तुमच्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 April 2021

एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला सुध्दा आल्यात का फाटलेल्या नोटा? आणि त्या नोटांचं आता काय करायचं याचाच विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अशा नोटा जर एटीएममधून आल्या असतील तर चिंता करू नका...आम्ही तुम्हाला या बातमीत सांगतो काय करायचं या नोटांचं..

नाशिक : एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला सुध्दा आल्यात का फाटलेल्या नोटा? आणि त्या नोटांचं आता काय करायचं याचाच विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अशा नोटा जर एटीएममधून आल्या असतील तर चिंता करू नका...आम्ही तुम्हाला या बातमीत सांगतो काय करायचं या नोटांचं..

ATM मधून फाटक्या नोटा आल्या... आता काय करायचं?
अनेक लोकं आता शक्यतो पैसे काढण्यासाठी एटीएमचाच वापर करतात. पण एटीएममधून पैसे काढताना समजा त्यातून फाटक्या नोटा आल्या तर अनेकवेळा आपल्याला प्रश्न पडतो कि आता काय करायचं?  पण आता टेन्शन घेऊ नका.. कारण तुम्ही या नोटा अधिकृतरित्या बदलून घेऊ शकता. हो हे खरं आहे. तुम्ही सहजपणे या नोटांची अदलाबदल करू शकता आणि स्वच्छ चलनी नोट घेऊ शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांनुसार बँकांना एटीएममधून निघणाऱ्या फाटक्या चलन नोटा बदलाव्या लागतील. आणि याला कोणतीही सरकारी बँक किंवा खाजगी बँका नाकारू शकत नाहीत. रिझर्व्ह बँकेने एप्रिल 2017 मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले होते की, सर्व बँका त्यांच्या शाखेत सर्व ग्राहकांच्या फाटक्या नोटा बदलतील. नेमकी ही प्रक्रिया कशी आहे वाचा....

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

कशी आहे ही प्रक्रिया?
एटीएममधून फाटक्या नोटा आल्यानंतर आपल्याला पैसे काढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या एटीएमच्या बँकेत जावे लागेल. मग बँकेला अर्ज द्यावा लागेल.अर्ज मागे घेण्याची तारीख, वेळ आणि एटीएमचे स्थान यांचा तपशील द्यावा लागेल. एटीएममधून पैसे काढताना प्राप्त झालेल्या स्लिपची प्रतही अर्जासोबत जोडावी लागेल. आपल्याकडे स्लिप नसेल तर मोबाईलवरील व्यवहाराचा तपशील द्यावा लागेल. अर्ज सादर करताच बँक अधिकारी खात्याच्या तपशिलाची पडताळणी करतील आणि तुम्हाला नव्या नोटा देतील. पण आता बॅंकानी समजा नकार दिला तर काय? असा प्रश्न येत असेल तर पुढे वाचा...

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 
बँकेने नकार दिल्यास बॅंकेला पडेल महागात.
बँकेमधून नोटा बदलण्यासाठी प्रक्रिया खूप सोपी आहे. जर एखादी बँक तुम्हाला यासाठी प्रतीक्षा करायला लावत असेल किंवा नोट बदलण्यास नकार देत असेल तर आपण पोलिसांत तक्रार करू शकता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार असे करणार्‍या बँकांना दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: torn notes changes process marathi news