TVS Motor शेअर्समध्ये 57 टक्क्यांची वाढ अपेक्षित

बँकेच्या नफ्यात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
TVS Motor
TVS Motoresakal
Summary

बँकेच्या नफ्यात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऑटोमोबाईल कंपनी टीव्हीएस मोटर्सचे (TVS Motor Company Limited) डिसेंबर तिमाहीचे (Q3FY22) निकाल बाजाराच्या अंदाजापेक्षा चांगले आले आहेत. निकालानंतर टीव्हीएस मोटर्सचे शेअर्स चांगले परफॉर्म करताना दिसले. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीचे निकाल 7 फेब्रुवारीला अर्थात सोमवारी जारी केले. बँकेच्या नफ्यात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा महसूलही वाढला आहे. निकालानंतर, बहुतेक ब्रोकरेज हाऊसेस टीव्हीएस मोटर्सबाबतीत सकारात्मक आहेत.

TVS Motor
Boom Motors ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फिचर्स

ब्रोकरेज हाऊसचे मत

TVS मोटरच्या तिमाही निकालावर ब्रोकरेज हाऊसचा रिपोर्ट चांगला आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. टारगेट 656 रुपयांवरून 711 रुपये करण्यात आली आहे. खर्चाचा दबाव असतानाही कंपनीने मार्जिन राखले आहे. एकूणच डिसेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले असल्याचे CLSA चे म्हणणे आहे.

ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने 810 रुपयांचे टारगेट देत आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. या स्टॉकला नोमुराकडून 'न्यूट्रल' रेटिंग आहे. पण प्रति शेअर टारगेट 559 रुपयांवरून 673 रुपये करण्यात आली आहे.

TVS Motor
लॉकडाऊनमध्येही Tata Motors ने सुरु केली गाड्यांची विक्री; टाटा मोटर्सची एक नंबर आयडिया...

तर दुसरीकडे UBS ने टीव्हीएस मोटर्सचे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला. सगळ्यात मोठे टारगेट UBS नेच दिले आहे. त्यांनी एक हजार रुपयांचे टारगेट दिले आहे. जेफरीजने स्टॉकवर 'बाय' रेटिंगसह 800 रुपयांचे टारगेट दिले आहे. देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने खरेदीचा सल्ला देत 776 रुपयांचे टारगेट दिले आहे.

57 टक्क्यांची वाढ अपेक्षित

7 फेब्रुवारी रोजी TVS मोटरच्या शेअरची किंमत 636.80 रुपये होती. ब्रोकरेज UBS ने स्टॉकचे टारगेट 1000 दिले आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या पुढे स्टॉकमध्ये सुमारे 57 टक्के वाढ होऊ शकते. गेल्या 5 दिवसांत स्टॉकने 2.5 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे.

TVS Motor
ब्रॅंडेड कंपन्यांचे महागडे 55 इंची Smart TV आता तुमच्या बजेटमध्ये!

तिसऱ्या तिमाहीचे निकाल

TVS Motor ने ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या तिमाहीत निव्वळ नफ्यात 9 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. त्यांचा नफा 288.8 कोटीवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 266 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीने डिसेंबर 2021 च्या तिमाहीत आतापर्यंत विक्रमी ऑपरेटिंग रेव्हेन्यू मिळवला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 5,706 कोटी रुपये होता, जो डिसेंबर 2020 च्या तिमाहीत 5,391 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचा EBITDA मार्जिन 10 टक्के राहिला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com