'पुढील वर्षी बेरोजगारी हे सरकारसमोरील मोठे आव्हान'

वृत्तसंस्था
Monday, 26 October 2020

आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेवरील सर्वांत वाईट काळ संपला असून, आर्थिक चक्र पुन्हा संथगतीने सुधारण्याच्या मार्गावर आहे, असेही ‘पीएचडीसीसी’ने म्हटले आहे.

नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ७.९ टक्‍क्‍यांनी घसरेल; मात्र २०२१-२२ मध्ये त्यात ७.७ टक्‍क्‍यांनी वाढ होईल, अशी अपेक्षा वाणिज्य आणि उद्योग संघटना ‘पीएचडीसीसी’ने व्यक्त केली. या काळात बेरोजगारी हे सरकारसमोरील मोठे आव्हान असणार आहे, असेही ‘पीएचडीसीसी’ने म्हटले आहे.

देशातील बेरोजगारीचा दर अजूनही चिंताजनक आहे. जुलैमध्ये असलेला बेरोजगारीचा दर ७.४ टक्‍क्‍यांवरून ८.३ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. भारताने यापुढे आयातीसाठी चीनऐवजी व्यापारास अनुकूल असलेल्या अन्य अर्थव्यवस्थांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याशिवाय देशांतर्गत उत्पादन वाढवत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही पीएचडीसीसीने म्हटले आहे.

हेही वाचा : हिवाळ्यात कोरोनाचे आव्हान अधिक; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आवाहन

२०२१ मधील तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत सकारात्मक वाढ होण्याच्या मागणीसाठी सरकारने मागणीनुसार उत्पादनाला प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. अग्रगण्य क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे स्टील, सिमेंट आणि वीज यांसारख्या वस्तूंची मागणी वाढेल, असे ‘पीएचडीसीसी’चे अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा  : राजधानी दिल्ली : बहुमताची एकाधिकारशाही

अर्थव्यवस्थेत संथगतीने सुधारणा
देशातील अनेक क्षेत्रांवरील कोरोनाचे दुष्परिणाम कायम राहतील, परंतु अलीकडील आर्थिक आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेवरील सर्वांत वाईट काळ संपला असून, आर्थिक चक्र पुन्हा संथगतीने सुधारण्याच्या मार्गावर आहे, असेही ‘पीएचडीसीसी’ने म्हटले आहे.

अग्रलेख : कायद्याचे भय गेले कुठे?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployment will be a major challenge for the government