नवीन वर्षातही होईल शेअर बाजारातून मोठी कमाई, रांगेत आहेत 45 IPO | IPO And Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPO
नवीन वर्षातही होईल शेअर बाजारातून मोठी कमाई, रांगेत आहेत 45 IPO

नवीन वर्षातही होईल शेअर बाजारातून मोठी कमाई, रांगेत आहेत 45 IPO

मुंबई : आयपीओचा (IPO) विचार केला तर हे वर्ष जबरदस्त ठरले आहे. शेअर बाजारने (Share Market) गुंतवणूकदारांना कमाई करण्याची अनेक संधी दिल्या आहेत. नवीन वर्षातही कमाईची मोठी संधी मिळणार आहे. पुढील दोन महिन्यात एलआयसीसह (LIC) ४५ कंपन्यांच्या आयपीओ बाजारात दाखल होऊ शकतात. बाजार नियंत्रक सेबीकडे गेल्या तीन महिन्यांमध्ये जवळपास ४० कंपन्यांनी आयपीओचे कागदपत्रे जमा केली आहेत. यात ओला, बायजू, ओयो यासारख्या प्रसिद्ध स्टार्टअपही सामील आहे. दुसरीकडे जगात सर्वात मोठी विमा कंपन्यांपैकी एक असलेली एलआयसीचा आयपीओही आहे. जे आयपीओच्या इतिहासात नवीन अध्याय जोडू शकतो. अंदाजानुसार एलआयसीचा आयपीओ ८० हजारांपासून एक लाख कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. ते जगातील आतापर्यंत सर्वात मोठा आयपीओ बनू शकतो. पुढील वर्षी फेब्रूवारीपर्यंत आयपीओ आणण्याच्या तयारीत असलेल्या कंपन्यांमध्ये गौतम अदानीची कंपनी अदानी विल्मरचेही नाव आहे.(Upcoming IPO January February 2022)

हेही वाचा: Marvel च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, TVSने आणलय थीम्स स्कूटर

या व्यतिरिक्त गो फर्स्ट एअरलाईन्स, ड्रूम टेक्नोलाॅजी, स्नॅपडीलही ओपन मार्केटमध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत. झोमॅटोनंतर आणखी एक फूड डिलिवरी कंपनी स्विगीही आयपीओ आणणार आहे. येणाऱ्या काळात डेल्हवरी, इक्सिगो, मोबिक्विक, फार्म ईजी, नवी, पायनलॅब्स आदींच्या आयपीओही गुंतवणुकदारांना कमाईची संधी देऊ शकते. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ६३ कंपन्या बाजारात आल्या आहेत. या सर्वांनी मिळवून बाजारातून जवळपास १.२९ लाख कोटी रुपये जमवले आहे. हे एका वर्षात आयपीओतून जमवलेले सर्वात मोठा आकडा आहे. या पूर्वी २०१७ मध्ये कंपन्यांनी खुल्या बाजारातून ७५ हजार कोटी रुपये जमवले होते. या वर्षातील मोठे आयपीओ पेटीएम (१८, हजार ३०० कोटी रुपये), झोमॅटो (९,३७५ कोटी रुपये) आणि स्टार हेल्थ (७, २४९ कोटी रुपये) प्रमुख आहेत.

Web Title: Upcoming Ipo January February 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPOLIC IPO