UPIद्वारे तुमचेही पैसे ट्रान्सफर होत नव्हते? 'हे' आहे त्यामागचं कारण

UPIद्वारे तुमचेही पैसे ट्रान्सफर होत नव्हते? 'हे' आहे त्यामागचं कारण

नवी दिल्ली : आज तुम्ही गुगल पे, फोन पे अथवा तत्सम स्वरुपाच्या ऍप्सद्वारे यूपीआय प्रणालीचा वापर करुन पैसे पाठवण्याचा प्रयत्न करत असाल, मात्र तुमचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला असेल. हो ना? मात्र, आता याचं कारण समोर आलंय. आज रविवारी सुमारे एक तासाच्या कालावधीसाठी युपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface - UPI) बंद झाले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India - NPCI) द्वारे विकसित करण्यात आलेली ही प्रणाली आता पुर्ववत झाली आहे.

UPIद्वारे तुमचेही पैसे ट्रान्सफर होत नव्हते? 'हे' आहे त्यामागचं कारण
पुण्यात दिवसभरात चार हजारहून अधिक नवे रुग्ण; महापौर म्हणतात...

NPCI ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका निवेदनामध्ये म्हटलंय की, "अधूनमधून येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे" या सेवा बंद पडल्या आहेत. पुढे त्यांनी म्हटलंय की, "अधूनमधून येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे UPI युझर्सना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मात्र, UPI आता कार्यरत आहे आणि आम्ही सिस्टमचे बारकाईने निरीक्षण करत आहोत.

UPIद्वारे तुमचेही पैसे ट्रान्सफर होत नव्हते? 'हे' आहे त्यामागचं कारण
रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक

UPI सर्व्हर डाउन असल्याची तक्रार अनेक युझर्सनी ट्विटरवर केली होती. डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म जसे की Google Pay आणि Paytm वापरून कोणतेही व्यवहार करता येत नव्हते. यासंदर्भात टेक समीक्षक नितीन अग्रवाल यांनी ट्विट केलं होतं की, "होय, ICICI बँकेने माहिती दिलीय की, त्यांची UPI सिस्टीम मेंटेनन्स अ‍ॅक्टिव्हिटींमुळे बंद आहे. मात्र, इतर अॅप्सबद्दल मात्र खात्रीलायक माहिती नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com