IPOचे प्रकार कोणते, कशी करायची गुंतवणूक?

IPOचे प्रकार कोणते, कशी करायची गुंतवणूक?

- भावना बाटीया

आयपीओचे प्रकार
मागील लेखात आपण आयपीओ म्हणजे काय? हे पाहिले,या लेखात आपण आयपीओचे प्रकार आणि त्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आयपीओ प्रकार हे त्यांच्या किंमतीमुळे पडतात.

  • फिक्स प्राइस इश्यू किंवा फिक्स प्राइस आयपीओ

  • बूक बिल्डिंग आयपीओ

IPOचे प्रकार कोणते, कशी करायची गुंतवणूक?
शेअर बाजारातील IPO म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

फिक्स प्राइस इश्यू किंवा फिक्स प्राइस आयपीओ -आयपीओ काढणारी कंपनी आणि त्या कंपनीमध्ये गुंतवणूक असणारी बँक एकत्र येऊन चर्चा करून आयपीओची किंमत ठरवतात. त्या ठरलेल्या किंमतीमध्ये कोणताही गुंतवणूकदार तो आयपीओ घेऊ शकतो.पण निर्धारित केलेल्या किंमतीमध्ये तो आयपीओ खरेदी करावा लागतो.

बूक बिल्डिंग आयपीओ-आयपीओ काढणारी कंपनी आणि त्या कंपनीमध्ये गुंतवणूक असणारी बँक एकत्र येऊन चर्चा करून आयपीओची किंमत ठरवतात.त्या नंतर त्या आयपीओची किंमत जाहीर केली जाते, यावर गुंतवणूकदार बोली लावतात,म्हणजेच लिलाव केला जातो.अशा प्रकारेत्या आयपीओची खरेदी केली जाते.प्राइज बॅड मध्ये जर आयपीओची किंमत कमी असेल तर त्यास फ्लोर प्राइस म्हणतात.जर आयपीओची किंमत अधिक असेल तर त्यास कॅप प्राइज म्हणतात.बूक बिल्डिंग आयपीओमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे कॅप प्राइज आणि फ्लोर प्राइज यांच्या किंमतीमध्ये 20 टक्के अंतर ठेवले जाते.
आयपीओमध्ये कशा प्रकारे गुंतवणूक केली जाते- आता पर्यत आपण जाणून घेतले
आयपीओ म्हणजे काय हे आपण जाणून घेतले आता आपण जाणून घेऊया

IPOचे प्रकार कोणते, कशी करायची गुंतवणूक?
Rolex Rings IPO: उद्या होणार रोलेक्स रिंग्जचा आयपीओ लाँच

आयपीओमध्ये गुंतवणूक कशी केली जाते.
ज्या कंपनीने आयपीओ काढला आहे ती कंपनी गुंतवणूकदारांना 3 -10 दिवसांचा अवधी देते. म्हणजेच काय कोणताही आयपीओ येणार असेल तेव्हा त्या कंपनीचे आयपीओ 3-10 दिवसांत खरेदी करू शकतात. अनेक कंपन्या अवघ्या 3 दिवसांचा अवधी देखील देतात. काही कंपन्या 3 दिवसांपेक्षा अधिकचा देखील देतात. कंपनीने दिलेल्या अवधीमध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्टर्ड गुंतवणूकदार आयपीओ मध्ये गुंतवणूक करू शकतात. जर आयपीओ फिक्स प्राइस आयपीओ असेल तर तुम्ही निर्धारित केलेल्या किंमतीवर आयपीओ खरेदी करू शकता. जर बूक बिल्डिंग आयपीओ असेल तर तुम्हाला त्या आयपीओसाठी रजिस्टर करून लिलाव पद्धतीने बोली लावावी लागते.

आयपीओ कसे दिले जातात?
कंपनीने आयपीओसाठी दिलेली मुदत संपल्या नंतर ती कंपनी त्यांच्या गुंतवणूकदारांना त्यांचे आयपीओ देते. त्या नंतर ते शेअर्स स्टॉक एक्सचेंज लिस्टमध्ये दाखविले जातात.स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर ते शेअर्स सेकेंड्री मार्केटमध्ये खरेदी किंवा विक्री केले जातात.जो पर्यत शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टमध्ये दाखवत नाहीत तो पर्यत त्यांची खरेदी विक्री केली जाऊ शकत नाही.स्टॉक मार्केटमध्ये वेळेनुसार शेअर्स खरेदी विक्री केले जातात.

सेबीची भूमिका-जेव्हा एखादी कंपनी त्यांचे आयपीओ काढतात तेव्हा त्यासाठी सेबी म्हणजेच सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची परवानगी घ्यावी लागते.सेबीचे आयपीओ संदर्भात काही नियम आणि अटी आहेत,त्यांची जर पूर्तता होत असेल तरच सेबी आयपीओसाठी परवानगी देते.रेड हेऱ्रिंग प्रोस्पेक्टे कंपनी मार्फत सेबीला दिला जातो.रेड हेऱ्रिंग प्रोस्पेक्टेसमध्ये कंपनीची सर्व माहिती,गुंतवणूक कशी असेल,त्यामध्ये काही जोखीमआहे का?त्यातील व्यवस्थापन कसे असेल,कंपनीची मागील गुंतवणूक आणि एकूणच स्थिती काय आहे ही सर्व माहिती या रेड हेऱ्रिंग प्रोस्पेक्टेसमध्ये दिलेली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com