Xpro India शेअर्सचा गुंतवणूक दारांना 2000 टक्के परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Xpro India

आता या शेअरमध्ये प्रॉफिट-बुकिंगची लाट येऊ शकते. पण प्रॉफिट-बुकिंग झाले की हा शेअर पुन्हा जोरदार वाढेल, असेही दिग्गजांचे म्हणणे आहे.

Xpro India शेअर्सचा गुंतवणूक दारांना 2000 टक्के परतावा

Multibagger stock : 2021 मध्ये असे अनेक स्टॉक आहेत जे मल्टीबॅगर सिद्ध झालेत. Xpro India हा देखील असाच स्टॉक आहे. पॉलिमर प्रोसेसिंग कंपनीचा हा शेअर आतापर्यंत 33.75 रुपयांवरून 2021 मध्ये 721.65 रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत त्याने आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ज्यांनी ज्यांनी हा शेअर खरेदी केला असेल त्यांची छप्परफाड कमाई झाली असेल यात शंकाच नाही. शेअर बाजारातील तज्ज्ञ या तेजीनंतरही या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आणखी तेजी येईल अशी शक्यता वर्तवत आहेत. Xpro India मधील कोणतीही घसरण ही खरेदीची संधी मानली पाहिजे, असे त्यांचे मत आहे.

हेही वाचा: Multibagger Stock : ‘या’ स्टॉकने 10 वर्षात 1 लाखाचे केले 10 कोटी!

या शेअरमध्ये लवकरच प्रॉफिट-बुकिंग दिसून येईल, पण प्रॉफिट-बुकिंगचा टप्पा संपला की तो पुन्हा जोरदार वाढेल, असेही दिग्गजांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकदा का घसरण सुरु झाली की हे शेअर्स नक्की खरेदी करा असा खात्रीचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत. या शेअरला 650 रुपयांच्या पातळीवर मजबूत सपोर्ट दिसत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

हेही वाचा: Multibagger Stock : APL अपोलो ट्युब्सने वर्भरात दिला २५० टक्के परतावा

या शेअरचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल, गेल्या 1 महिन्यात तो 669 रुपयांवरून 721.65 रुपयांपर्यंत वाढत 7 टक्के परतावा दिला. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत, हा स्टॉक 118.70 रुपयांवरून 721.65 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत त्याने 500 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. त्याच वेळी, यावर्षी आतापर्यंत हा शेअर 33.75 रुपयांवरून 721.65 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरमध्ये 21.38 पट वाढ झाली आहे.

जर एखाद्याने 1 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 1.08 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 6 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2021 च्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 21.38 लाख रुपये मिळाले असते. 780 रुपयांवर फ्रेश ब्रेकआउट दिसू शकतो असे चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया म्हणाले. खाली 650 रुपयांच्या पातळीवर त्याला मजबूत सपोर्ट दिसत असल्याचे बगडियांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: IRCTC Stock मध्ये भूकंप! आणखी खाली येतील का शेअर्स ?

या शेअरमध्ये जराही घसरण दिसल्यास तात्काळ खरेदी करावा असा सल्लाही त्यांनी दिला. कारण आतापर्यंतच्या दमदार तेजीनंतर त्यात नफा वसुली अर्थात प्रॉफिट बुकींग स्वाभाविक आहे. पोझिशनल गुंतवणूकदारांनी 650 रुपये किंवा 780 रुपयांवर आढळल्यास, हे शेअर्स लाँग टर्मसाठी खरेदी करा, असा सल्लाही बगडिया यांनी दिला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top