भन्नाट Business Ideas! एका दिवसात सहज कमवाल 4,000 रुपये

या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतेही वेगळे प्रशिक्षण दिले जात नाही.
rupees
rupeesesakal
Summary

या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतेही वेगळे प्रशिक्षण दिले जात नाही.

तुम्ही बिझनेस (Business) करण्याच्या तयारीत असाल, तर आम्ही तुम्हाला अशी बिझनेस आयडिया देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही एका दिवसात 4,000 रुपये सहज कमवू शकता. या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतेही वेगळे प्रशिक्षण दिले जात नाही. पण यात एका महिन्यात 1,20,000 रुपये सहज कमावता येतात. तर आम्ही कॉर्न फ्लेक्स व्यवसायाबाबत (Corn Flakes Business) बोलत आहोत. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही अगदी काही महिन्यात कोट्यधीश होऊ शकता.

rupees
Business Idea : उत्तम बिझनेसमन व्हायचयं? मग हे 6 चित्रपट पाहाच!

मक्याबद्दल अर्थात कॉर्न फ्लेक्सबाबत (Corn Flakes) आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये बहुतेक घरांमध्ये कॉर्न फ्लेक्स असतातच. जे डाएटप्रेमी (Diet lover) आहेत, त्यांच्याकडे तर कॉर्न फ्लेक्सचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळेच याचा बिझनेस ही एक अतिशय चांगली कल्पना आहे. आता जाणून घेऊयात हा व्यवसाय कसा सुरू करायचा?

किती जागा लागेल ?

हा व्यवसाय (Business) सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जमीन असावी जिथे तुम्ही याचा प्लांट लावू शकता. याशिवाय स्टोरेजसाठीही जागा आवश्यक आहे. गोदामाचीही आवश्यकता असणार आहे. तुमच्याकडे एकूण 2000 ते 3000 चौरस फूट जागा असावी. मशिन, वीज, जीएसटी क्रमांक, कच्चा माल, जागा आणि स्टॉक ठेवण्यासाठी गोदाम लागेल.

rupees
Business : रोजगार गेला; पण सुरू केला खेळण्यांचा व्यवसाय

कुठे व्यवसाय करायचा ?

ज्या ठिकाणी मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतील त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू करा. दूर ठिकाणाहून मका आणून त्याचे कॉर्न फ्लेक्स बनवले तर ते खूप महाग पडेल, म्हणून आपण अशी जागा शोधली पाहिजे जिथे आपल्याला चांगल्या प्रतीचा मका मिळेल किंवा आपण स्वतः मका पिकवू शकू. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायात वापरल्या जाणार्‍या मशिन्सचा उपयोग फक्त मक्यापासून बनवलेले कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठीच केला जात नाही तर गहू आणि तांदूळाच्या फ्लेक्स बनवण्यासाठीही वापरता येतो.

किती गुंतवणूक लागेल?

तुम्हाला व्यवसाय लहान स्तरावर सुरू करायचा आहे की मोठ्या स्तरावर यावर पैशांचं गणित अवलंबून आहे. सध्या या व्यवसायासाठी सुरुवातीला किमान 5 ते 8 लाखांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

rupees
नोकरीला कंटाळून सुरु केला Business! आता जगात आहे टॉप 1 कंपनी

केंद्र सरकारची मदत

मुद्रा कर्ज योजने अंतर्गत सरकार स्टार्ट-अप उद्योगांना 90 टक्क्यांपर्यंत कर्जाची सुविधा देते. जर तुम्ही 50000 रुपयांपासून व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला सुरुवातीला फक्त 50,000 रुपये गुंतवावे लागतील, बाकी रक्कम तुम्हाला सरकारकडून कर्जाच्या स्वरूपात मिळतील.

नफा किती ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्याची किंमत सुमारे 30 रुपये आहे आणि बाजारात हेच कॉर्न फ्लेक्स 70 रुपये किलो दराने किंवा त्याहीपेक्षा जास्त दराने सहज विकले जातात. जर तुम्ही एका दिवसात 100 किलो कॉर्न फ्लेक्स विकले तर तुमचा नफा सुमारे 4000 रुपये होईल. त्याच वेळी, जर तुम्ही महिन्याचा विचार केला तर तुम्हाला 1,20,000 रुपयांपर्यंत कमाई होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com