YouTubeचा भारताच्या जीडीपीत ६ हजार ८०० कोटींचे योगदान

युट्यूबने आज नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे.
You Tube Channels
You Tube Channelse sakal

मुंबई : युट्यूबने आज नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल 'ऑक्सफर्ड इकाॅनाॅमिक्स' (Oxford Economics) या स्वातंत्र सल्लागार कंपनीने तयार केला आहे. युट्यूबच्या निर्मात्यांच्या माध्यमातून भारतीय जीडीपीत २०२० वर्षात ६ हजार ८०० कोटी रुपयांचा वाटा नोंदविला आहे. यातून देश साॅफ्ट पाॅवर म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक प्रभाव यावर परिणाम होत आहे. निर्माता आणि कलाकार हे भावी पिढ्यांचे माध्यम कंपन्या स्थापन करित असून जागतिक प्रेक्षक, त्याचा परिणाम आर्थिक विकासावर होत आहे, असे अपॅक यूट्यूब (YouTube) भागीदारचे प्रादेशिक संचालक अजिय विद्यासागर यांनी सांगितले. (YouTube Creators Contributed 6800 Crore In Indian GDP)

You Tube Channels
आंतरराष्ट्रीय खेळाडूची उपासमार, राज ठाकरेंनी फोनवरुन संवाद साधून दिला धीर

भारतातील बुहसंख्य युट्यूब वाहिन्यांना जवळपास एक लाख वर्गणीदार आता ती ४० हजार जवळपास, म्हणजे विकास ४५ टक्के प्रत्येक वर्षाला. अनेक भारतीय यूट्यूब निर्माते या व्यासपीठावर संधी आणि प्रेक्षक शोधतायत. हा अहवाल बऱ्याच गोष्टी बाहेर काढतो आणि अर्थव्यवस्था आकड्यात मांडतो. त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम भारतातील (India) यूट्यूब व्यवस्थेवर होतोय, असे ऑक्सफर्ड इकाॅनाॅमिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँड्रियन कूपर म्हणाले. भारतात जवळपास ८० टक्के सर्जनशील उद्योजक म्हणतात, व्यासपीठाचा सकारात्मक परिणाम त्यांच्या व्यावसायिक ध्येयांवर झाला आहे.

You Tube Channels
'ऑस्कर'च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर सूर्याचा 'जय भीम'

यूट्यूब हे निर्मात्यांना आठ वेगवेगळ्या मार्गांनी त्यांच्या आशयाच्या निर्मातीतून करता येईल. अनेक यूट्यूब वाहिन्या सहा अंकी महसूल मिळवितात. त्यात वर्षानुवर्ष ६० टक्क्यांनी वाढ होतेय. जवळपास ९२ टक्के एसएमबीसह यूट्यूब चॅनल सहमत आहेत, की यूट्यूब त्यांना नवीन प्रेक्षकांपर्यंत जाण्यास मदत करित असल्याचा उल्लेख अहवालात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com