esakal | झिरोधाला म्युच्युअल फंड सुरु करण्यास मिळाली मान्यता: नितीन कामत
sakal

बोलून बातमी शोधा

झिरोधाला म्युच्युअल फंड सुरु करण्यास मिळाली मान्यता: नितीन कामत

भारतातील म्युच्युअल फंड उद्योग 35 लाख कोटी रुपयांचा आहे.

झिरोधाला म्युच्युअल फंड सुरु करण्यास मिळाली मान्यता: नितीन कामत

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

झिरोधाला सेबीकडून मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) स्थापन करण्यास तत्वतः मान्यता मिळाल्याचे झिरोधाचे संस्थापक नितीन कामत यांनी सांगितले. देशातील सर्वात मोठ्या डिस्काउंट ब्रोकर कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये म्युच्युअल फंड परवान्यासाठी अर्ज केला होता. आता सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर झिरोधा कधीही मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (Asset Management company) सुरू करू शकते.

हेही वाचा: ICICI Bank 5 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप साध्य करणारी दुसरी बँक

यापूर्वी ऑगस्टमध्ये बजाज फिनसर्वला मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (Asset Management company) सुरू करण्यासाठी सेबीकडून तत्वतः मान्यता मिळाली होती. भारतातील म्युच्युअल फंड (Mutual Fund) उद्योग 35 लाख कोटी रुपयांचा आहे.

हेही वाचा: नुकताच लिस्ट झालेला केमिकल स्टॉक 19 टक्क्यांनी वधारणार

झिरोधाच्या (Zerodha) डिस्काउंट ब्रोकरेज व्यवसायाचे लक्ष्य व्यवहार खर्च (Transaction Cost) कमी करणे आहे. कंपनीने स्वस्त निधी सुरू करण्याची योजना आखली होती. निष्क्रिय, साधे, स्वस्त-निर्देशांकावर ट्रेड होणारे फंड सादर केले जातील, असे त्यावेळी कामत म्हणाले होते. जर म्युच्युअल फंड उत्पादने (Mutual Fund Products) सुलभ असतील तरच गुंतवणूकदार आकर्षित होऊ शकतात, असेही नितीन कामत यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: 'कोटक महिंद्रा' विकणार भारती एंटरप्रायजेसला 'एअरटेल'चे 20 कोटी शेअर्स

झिरोधाने 2010 मध्ये “20 रुपये प्रति ऑर्डर ब्रोकर” म्हणून आपला प्रवास सुरू केला होता. कोणतेही अतिरिक्त शुल्क आणि कमी दलाली यामुळे हळूहळू त्याची लोकप्रियता वाढत गेली. झिरोधा एका दिवसात एक्सचेंजवर 40 लाख व्यवहार हाताळते. किरकोळ गुंतवणूकदारांमध्येही झिरोधा लोकप्रिय होत आहे. झिरोधा कॉईन (Coin) प्लॅटफॉर्मद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये थेट गुंतवणूक करण्यास सक्षम आहेत. कॉईन (Coin) सध्या 5500 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन (Asset Management) करते.

हेही वाचा: साखरेच्या 8 शेअर्सची 'विक्रमी' उडी

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top