शंभूराज.. सिर्फ नामही काफी है! देसाईंना वाढदिनी चाहत्यांकडून हटके शुभेच्छा I Shambhuraj Desai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

आज 17 नोव्हेंबर... गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) साहेबांचा वाढदिवस.

शंभूराज.. सिर्फ नामही काफी है! देसाईंना वाढदिनी चाहत्यांकडून हटके शुभेच्छा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

-मिलिंद माळी

आज 17 नोव्हेंबर... गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) साहेबांचा वाढदिवस. योगायोग असा की साहेबांकडे काम करून मलाही १७ वर्षे पूर्ण झाली. २००४ पासून तालुक्याच्या राजकारणात, समाजकारणात साहेबांसोबत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. साहेब म्हणायचे ‘मिलिंदा.. आपण इतिहास वाचायला नाही, रचायला आलोय.’ साहेबांचे जवळून कार्यकर्तृत्व पाहणारा मी त्यांचा एक मावळा आहे. साहेबांविषयी एवढंच सांगेन, ‘गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई... सिर्फ नामही काफी है!’

कोरोना महामारीनंतर राज्यमंत्री म्हणून आपला वाढदिवस आज दिमाखात साजरा होत आहे. आपल्या वाढदिवसाची अलोट गर्दी तालुक्याच्या नेहमीच स्मरणात राहणारी असते, कारण इतकी माणसे आपण ५५ वर्षांच्या जीवनात कमावली. शिवपुत्र छत्रपती शंभूराजे यांचे नाव घेतले, की जसे अंगात दहा हत्तीचे बळ येते तसेच नुसते शंभूराज देसाई साहेब हे नाव एकताच अंगात दहा हत्तीचे बळ येऊन ऊर्मी निर्माण होते. ५५ वर्षांच्या जीवनातील आपला ३७ वर्षांचा कालखंड संघर्षात गेला. या कालखंडात आपण कधी अत्युच्च आनंदाचे क्षण अनुभवले, तर कधी अनेक संकटांचा सामनाही केला. ‘आपण इतिहास वाचायला नाही, रचायला आलात’ हे वेळोवेळी आपल्या कुशल कार्य कर्तृत्वातून दाखवूनही दिले. मनाची जी श्रीमंती लोकनेते (कै.) आबासाहेबांनी जोपासली तीच श्रीमंती आपणही जोपासली. सातारा जिल्ह्यातील तीन पिढ्या आपणाबद्दल आदर, सन्मान बाळगून आहेत. कारण आपण सर्वांना आपले आणि जवळचे वाटता.

हेही वाचा: दगा फटका टाळण्यासाठी 28 जणांना सोबत घेऊन रांजणे 'नॉट रिचेबल'

साहेबांकडे गृह विभागासारख्या संवेदनशील खात्याचा कार्यभार असूनही प्रसंगी दुचाकीवरून, तर कधी पायी फिरून आढावा घेतात तेही सेाबत कसलाही बंदोबस्त न घेता. साहेबांपुढे मी अभिमानाने अनेकदा म्हणतो, ‘‘शंभूराज, एक ऐशी किताब है, जिसके हजारो पन्ने अभी तक बहोत से लोगोंने नही पढे है।’ ज्यांच्याबद्दल भरभरून व्यक्त व्हावंस वाटतं असं चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणजे साहेब. त्यांची शिकवण कधीच पुसट होत नाही ना कधी होईल. या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा मला नेहमीच आदर आणि आधार वाटत आला आहे. अडचणीच्या वेळी त्यांनी व्यक्तिशः मला, मतदारसंघातील जनतेला दिलेला धीर, आधार कधीही विसरता येणार नाही. म्हणूनच ते माझ्यासह सर्वांचे दैवत आहेत. त्यांचे ऋण कधीही न फिटणारे आहे. पहिल्या पंचवार्षिकमध्ये ‘उत्कृष्ट संसदपटू’चा पुरस्कार मिळाल्यानंतर पाटणच्या सत्काराच्या समारंभात साहेबांनी पाठीवर टाकलेली थाप आणि सहज म्हणून उच्चारलेल्या शुभेच्छा माझ्याबाबतीत वरदान ठरल्या आहेत.

हेही वाचा: UP Election : अखिलेश यादव, मायावतींना योगींचा दणका

साहेब, महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणामध्ये कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेले राज्यातील अनुभवी, अभ्यासू नेत्यांपैकी ते एक आहेत, याचा आम्हाला स्वाभिमान आहे. मंत्री म्हणून चांद्यापासून बांध्यापर्यंत पायाला भिंगरी लावून आपण फिरत आहात. साहेब, हे सर्व करत असताना तब्येतीचीही काळजी घ्या. आपल्या हृदयात आता संपूर्ण महाराष्ट्र आहे हे नक्की; पण काळजात पाटण मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडीवस्ती आणि प्रत्येक व्यक्ती आहे ही बाब पक्की. आपल्या हातून उभ्या महाराष्ट्राचं भलं व्हावे, हीच आपल्या वाढदिनी श्री. सिद्धिविनायक चरणी प्रार्थना!

हेही वाचा: विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता NCP पॅनेलला मत द्या : शिवेंद्रसिंहराजे

loading image
go to top