दगा फटका टाळण्यासाठी 28 जणांना सोबत घेऊन रांजणे 'नॉट रिचेबल'; आमदार शिंदेंसाठी धोक्याची घंटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

निवडणुकीत जिल्ह्यातील राजे मंडळी बिनविरोध होऊन बाजूला झाली आहेत.

दगा फटका टाळण्यासाठी 28 जणांना सोबत घेऊन रांजणे 'नॉट रिचेबल'

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) सर्वाधिक रंगतदार लढत जावळी सोसायटी मतदारसंघात होत असून राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदेंच्या (MLA Shashikant Shinde) विरोधात राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी आव्हान उभं केलंय. श्री. रांजणे यांनी विजयाचे गणित डोक्यात ठेऊन सुमारे २८ मतदारांना सुरक्षित स्थळी रवाना केले आहेत. आता प्रचार सुरू असताना आमदार शिंदे जावळी तालुक्यात तळ ठोकून असून स्वतः फिरून मतदारांशी संपर्क करत आहेत. मात्र, शिंदे यांच्यापुढे आव्हान निर्माण करणारे रांजणे मात्र सध्या 'नॉट रिचेबल' आहेत. त्यामुळं ही आमदार शिंदेंसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

हेही वाचा: 'निवडणुकीत गृहराज्यमंत्र्यांकडून पैशाचा वापर'

बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजे मंडळी बिनविरोध होऊन बाजूला झाली आहेत. प्रत्यक्ष निवडणूक लढण्याची वेळ मात्र, जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांवर आलीय. यामध्ये सहकार मंत्री बाळसाहेब पाटील (Balasaheb Patil), गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आमदार शशीकांत शिंदे यांचा समावेश आहे. यामध्ये अत्यंत चुरशीची ठरलीय ती जावळी सोसायटीची निवडणूक. येथे आमदार शशीकांत शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज भरला. पण, राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याने श्री. रांजणे हे माघार घेतील, या विश्वासावर आमदार शिंदे राहिले. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रांजणे यांच्याशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांनीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा: विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता NCP पॅनेलला मत द्या : शिवेंद्रसिंहराजे

तसेच मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जावळीतून लढण्यास सांगितले असल्याचे सांगत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. परिणामी, शशीकांत शिंदेंची अडचण झाली. त्यावेळपासून श्री. रांजणे हे नॉट रिचेबल आहेत ते आजपर्यंत कोणाच्याच संपर्कात आलेले नाहीत. जावळी सोसायटी मतदारसंघात ४९ मतदार आहेत. ज्यांना २४ पेक्षा जास्त मते पडतील तो उमेदवार निवडून येणार आहे. त्यामुळे हे गणित लक्षात घेऊन ज्ञानदेव रांजणे यांनी २८ मतदारांना सुरक्षित स्थळी रवाना केले आहे. ते राजस्थान परिसरात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारांपर्यंत कोणी पोहोचू नये, तसेच ऐनवेळी दगा फटका होऊ नये, हे लक्षात घेऊन रांजणे या मतदारांसह 'नॉट रिचेबल' आहेत. तसेच सौरभ शिंदे यांच्याकडे तीन, चार मते आहेत. हे मतदारही सुरक्षित स्थळी आहेत. ही मते निर्णायक होऊ शकतात. तर आमदार शशीकांत शिंदेंनी आतापर्यंत २१ मतांची जुळवा जुळव केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: UP Election : अखिलेश यादव, मायावतींना योगींचा दणका

loading image
go to top