BLOG : राष्ट्रीय मतदार दिवस : त्रुटी, अनास्था कायम! मग साध्य काय?

मतदान करणं हा आपल्या प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आणि नागरिक म्हणून मुलभूत कर्तव्य आहे.
Blog on National Voters Day
Blog on National Voters Day
Updated on

National Voter's Day 2022 : लोकशाही व्यवस्थेत (Demecrocy System) निवडणूक अर्थात सार्वत्रिक मतदान ही एक आदर्श पद्धती आहे. लोकांची लोकांसाठी असलेली ही राजकीय व्यवस्था प्रत्येक अधिकृत नागरिकाला मतदानाचा अधिकार (Voter's Right) प्राप्त करुन देते. यासाठी गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, शिक्षित-अशिक्षित, आस्तिक-नास्तिक अशा कुठल्याही स्वरुपाचा भेद लागू नसतो. ही आदर्श घटनादत्त व्यवस्था जर आपणच आपल्यासाठी बनवलेली असेल तर तीची काळजी घेणं आणि ती राजकीय संस्काराच्या स्वरुपात प्रत्येकामध्ये रुजणं अत्यंत गरजेचं आहे. एकूणच मतदान हा आपल्या प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार (Democratic rights) आणि नागरिक म्हणून मुलभूत कर्तव्य आहे. (Blog National Voters Day Error remains lack of interest so what did we achieve)

Blog on National Voters Day
"शरद पवार आहेत म्हणून महाविकास आघाडीचं सरकार जोरात"

'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणं मताचंही आहे. एका-एका व्यक्तीच्या मतानं विशिष्ट राजकीय गटाला राष्ट्रनिर्मितीच्या व्यवस्थेत उतरता येतं. पण त्यासाठी मतदान डोळसपणे होणं गरजेचं ठरतं. जनतेच्या मताशिवाय लोकशाही व्यवस्था चालूच शकत नाही. जितकं मतदानाचं प्रमाण जास्त तितकी ती व्यवस्था सक्षम. त्यामुळंच अधिकाधिक मतदान कसं होईल? हे या व्यवस्थेपुढील मोठं आव्हान असतं. ताज्या आकडेवारीनुसार भारतासारख्या १३८ कोटी ( सन २०२० नुसार) लोकसंख्येच्या देशात प्रौढ नोंदणीकृत मतदारांचं प्रमाणं ६६ टक्के (२०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीनुसार) इतकं आहे. पण या प्रमाणापैकी प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेत ६७.४० टक्के मतदारांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सुमारे ३२ टक्के लोकांची मतदानाप्रती अनास्था असल्याचं दिसून आलं, ही अनास्थाच व्यवस्थेपुढील यक्ष प्रश्न आहे. (Blog on National Voters Day)

Blog on National Voters Day
जिद्द असेल तर काहीही साध्य! नाशिकच्या स्वयमला राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार

राष्ट्रीय मतदार दिनाची का भासली गरज?

भारतीय राज्यघटनेनुसार, मतदानासाठी किमान पात्र वय १८ वर्षे आहे. या वयात नुकताच प्रवेश केलेल्या तरुणाईला मतदानासाठी प्रवृत्त करणं हे मोठं आव्हान आहे. त्यासाठी काय करता येईल? या विचारातून मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी साचेबद्ध कार्यक्रम राबवणं गरजेचं असल्याचं गेल्या सरकारांना वाटलं. त्यातूनच 'राष्ट्रीय मतदार दिवसा'चा जन्म झाला. पण जी तारीख यासाठी निश्चित करण्यात येईल तीचं देखील काही वैशिष्ट्य असणं अपेक्षतचं होतं. त्यातूनच मग ज्या दिवशी भारतातील निवडणूक व्यवस्था पाहणाऱ्या 'निवडणूक आयोग' या स्वयत्त संस्थेची स्थापना (२५ जानेवारी १९५०) झाली, तो २५ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून निश्चित करण्यात आला. यासाठी मतदारांची वयनिश्चिती १ जानेवारीपासून करण्याचंही ठरलं. त्यानुसार, सन २०११ मध्ये २५ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून घोषीत झाला. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारनं यासंबंधीचा कायदा मंजूर केला आणि त्यावर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी शिक्कामोर्तब केलं. नवमतदारांमध्ये निवडणूक व्यवस्थेबद्दल जागृती करणे, त्यांची मतदान नोंदणी वाढवणे एकूणच त्यांना आपला सार्वत्रिक प्रौढ मताधिकार निश्चित करण्यास प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा हेतू. २०११ सालापर्यंत पात्र तरुण नाव नोंदणीसाठी फारसे उत्सुक नसायचे. त्यामुळं केवळ २० ते २५ टक्केच नवमतदारांची नोंदणी होत होती. सहाजिकचं ही टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढणं अपेक्षित होतं.

Blog on National Voters Day
युरोपात बर्फवृष्टी : विमानतळ बंद, रस्त्यावर वाहने अडकली

स्पर्धा आणि विविध कार्यक्रम

नव्या राष्ट्रीय कार्यक्रमानुसार, नवमतदारांची वेळेवर नोंदणी करुन त्यांना दरवर्षी २५ जानेवारीला 'राष्ट्रीय मतदार दिनी' मतदार ओळख पत्रांच्या वाटपांचा कार्यक्रम सुरु झाला. तसेच मतदार म्हणून नोंदणी होणं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी 'प्राऊड टू बी वोटर अँड रेडी टू वोट' अशा बॅचचंही वाटप सुरु झालं. दरवर्षी हा दिवस साजरा करताना त्यात नवा उत्साह असावा यासाठी विशिष्ट थीमही ठेवण्याचं निश्चित झालं. यंदा १२ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे. यासाठी निवडणूक आयोगानं तरुणांच्या हातात असणाऱ्या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्याचं ठरवंल आहे. त्यानुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व मतदारांसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 'माझं मत, माझं भविष्य : ताकद एका मताची' असं या स्पर्धेचं नाव आहे. यामध्ये गाणी, प्रश्नमंजुषा, पोस्टर, व्हिडिओ तसेच घोषणा या बाबींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमधील विजेत्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार असल्याचं नुकतंच निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.

आजवर काय साधलं?

गेल्या बारा वर्षांपासून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा होत आहे. पण शेवटी प्रश्न निर्माण होतोच की, इतक्या वर्षात आपण हा दिवस साजरा करुन काय साधलं? त्यासाठी स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या तेव्हापासून 'राष्ट्रीय मतदार दिवस' सुरु होईपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केल्यास सन १९५१-५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात (१७ कोटी ३२ लाख १२ हजार ३४३) इतके एकूण मतदार होते, यांपैकी ४४.८७ टक्के इतकं मतदान झालं होतं. त्यानंतर सुमारे साठ वर्षांनंतर २००९ मध्ये (७१ कोटी ६९ लाख ८५ हजार १०१) इतके एकूण मतदार होते, यांपैकी ५८.२१ टक्के मतदान पार पडलं. पण 'राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा व्हायला लागल्यापासून सन २०१४ मध्ये (८३ कोटी ४० लाख ८२ हजार ८१४) मतदारांची एकूण नोंदणी झाली यांपैकी ६६.४४ टक्के मतदान पार पडलं. त्यानंतर सन २०१९ (९१ कोटी १९ लाख ५० हजार ७३४) इतक्या मतदारांची नोंद झालेली पहायला मिळाली, यावेळी ६७.४० टक्केच मतदान झालं. म्हणजेच पहिल्या निवडणुकीच्या वेळेपासून आत्तापर्यंत भारतातील प्रौढ मतदारांची एकूण संख्येत सुमारे १८.६८ टक्क्यांनी वाढ झाली. ही भारतासारख्या विशाल देशातील लोकशाहीसाठी आजिबात आश्वासक नाही. एकूणच राष्ट्रीय मतदार दिवसाचा हेतू पाहिजे तितक्या वेगानं साध्य होताना दिसत नाही, त्यामुळं यातील त्रुटी दूर करण्यासाठी आणखी वेगळ्या वेगवान पद्धतीनं आणि जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.

(टीप : लेखातील आकडेवारीचा संदर्भ निवडणूक आयोग वेबसाईट आणि विकिपीडिया)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com